Next
‘साहित्यिकांनी नीतिमूल्ये जपावीत’
प्रेस रिलीज
Tuesday, August 01, 2017 | 06:15 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘साहित्य हा समाजाचा मोठा आदर्श असतो. साहित्यिकांच्या साहित्यामधून समाजाला आपले जीवन समृद्ध करण्याची योग दिशा मिळत असते आणि म्हणून प्रत्येक साहित्यिकाने नीतिमूल्यांची जपणूक केली पाहिजे,’ असे मत जेष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी साहित्य गौरव आयोजित सहाव्या साहित्य गौरव संमेलनात व्यक्त केले.

कादंबरी, काव्य, आत्मकथन, पर्यावरण, ज्योतिष आदी विविध पातळ्यांवर कसदार लेखन करणाऱ्या १८ साहित्यिकांना डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी डॉ. घाणेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आघाडीच्या लेखिका कवयित्री डॉ. पल्लवी बनसोडे होत्या. त्यांना घाणेकर यांच्या हस्ते इंदिरा संत साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी हास्य काव्य विश्वकोशाचे प्रकाशन झाले. डॉ. योगेश जोशी, साहित्य गौरव संस्थेच्या कार्याध्यक्षा मंदा नाईक प्रमुख निमंत्रक मेघना घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘साहित्यिकांनी समाजाची सुखदुःखे जाणून घेऊन समाजाला दिलासा द्यावा,’ असे डॉ. बनसोडे म्हणाल्या. प्रारंभी तन्मयी घाणेकर यांनी स्वागतगीत सादर केले. ॠचा हस्ते यांनी निसर्गकवितांवर आधारित ‘बिनभिंतीची शाळा’ हा तरल आविष्कार सादर केला. ‘डहाळी’ अनियतकालिकाच्या ६२ व्या अंकाचे प्रकाशनही या सोहळ्यात करण्यात आले. डॉ. सुधीर कुलाल, पं. विजय जकातदार, मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, देवयानी घुगले, डॉ. नीलम खानापूरकर यांचे विशेष सन्मान करण्यात आले. डॉ. अनुपमा जाधव, दिलीप बर्वे, डॉ. सीमा घाटे, हेमंत नेहते, रघुवीर खटावकर, विजया जोशी, शिल्पा वाडेकर राजेंद्र जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक जयश्री बापट यांनी विशेष सहकार्य केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
डॉ.सौ.अनुपमा जाधव About
अप्रतिम कार्यक्रम डॉ.मधुसूदन घाणेकर सर आपल्या कार्याला सलाम। दाही दिशा दुमदुमणार आपलेचं नाम। मनस्वी आभार सर
0
0

Select Language
Share Link
 
Search