Next
मोफत अॅरोबिक क्लासेस
BOI
Wednesday, May 03, 2017 | 05:30 PM
15 3 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोपिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका अनुराधा देविदास गोफणे यांनी नागरिकांसाठी एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. प्रभागातील लोकांना सुदृढ बनवण्यासाठी आठ मेपासून १५ दिवस मोफत फिट अँड फिटनेस अॅरोबिक क्लासेस घेण्यात येणार आहेत. प्रशिक्षिका राजश्री मोर मार्गदर्शन करणार आहेत. 

नगरसेविका अनुराधा देविदास गोफणेवय वर्षे ४० पर्यंतचे नागरिक यात सहभागी होऊ शकणार आहेत. सात मेपर्यंत नागरिकांना या वर्गासाठी नाव नोंदणी करता येईल. जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन गोफणे यांनी केले आहे.

स्थळ : ध्यानमंदिर हॉल, सखुबाई गवळी गार्डन, आळंदी रोड, भोसरी ३९
वेळ : सकाळी ७ ते ८, ८ ते ९, ९.३० ते १०.३०, १०.३० ते ११.३० 

संपर्क :
राजश्री मोर : ९५२७६ ३२०२४
 
15 3 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search