Next
‘स्वत:च्या घराचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही’
‘लोकसंवाद’मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना
BOI
Thursday, January 03, 2019 | 12:40 PM
15 0 0
Share this article:

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : ‘स्वत:चे घर उभारण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. मातीच्या घराचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पक्क्या घरात झाले. सुरक्षितपणे जगता येऊ लागले,’ अशा शब्दांत अनेक लाभार्थींनी दोन जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केल्या.

फडणवीस यांनी बुधवारी राज्यातील गडचिरोली, लातूर, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, वर्धा, सातारा, नांदेड आदी जिल्ह्यांतील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आदी योजनांचा लाभ घेतलेल्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी लाभार्थ्यांनी ही भावना व्यक्त केली. लोकसंवाद कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातून २३ लाभार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात या जिल्ह्यांतील लाभार्थ्यांनी घरकुलमुळे आमच्या जीवनमानात बदल झाल्याचे, तसेच स्वतःचे पक्के घरकुल मिळाल्यामुळे समाधानी असल्याचे सांगितले.

सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसंवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातून सुभाष खताळ (लांबोटी), अशोक बाणेगांव (भंडारकवठे), आमसिद्ध गुंदगे (हत्तूर), गोरख गायकवाड (कासेगांव), महादेव जाधव (मालेगांव), लक्ष्मण गावडे (गावडेवाडी), सुरेश माळी, बाळू कांबळे, साहेबराव गायकवाड, तनुजा नवनाथ काळे, कलावती दगडू काळे, मीनाक्षी किशोर घोडके, सुजाता मधुकर सुरवसे, रेश्मा भारत वाघमारे, बाबासो मुलाणी, सत्तर खतीब (मंगळवेढा), अप्पासाहेब अंबादास चंदनशिवे (वरवडे), सरोज राजकुमार शिंगे, मेहबुब शेख (दोघेही अक्कलकोट) आदी सहभागी झाले होते.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, ग्रामीण विकास यंत्रणेचे (डीआरडीए) प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे, पंढरपूरचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, मोहोळचे मुख्याधिकारी एम. एम. पाटील, प्रज्ञा पोतदार, ‘डीआरडीए’चे अभियंता प्रदीप कुलकर्णी, मुनाफ आडते, सर्फराज शेख, बसवराज मेंडी आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search