Next
विविध मान्यवरांच्या जन्मशताब्दीनिमित्त जनसेवा ग्रंथालयाचे हस्तलिखित
लेखन पाठविण्याचे आवाहन
BOI
Saturday, August 04, 2018 | 05:40 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे ‘शब्दांकुर’ हा हस्तलिखित अंक यंदाही साकारण्यात येत आहे. या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि विंदा करंदीकर यांच्यासह अनेक मान्यवरांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने या मान्यवरांना शब्दरूप आदरांजली वाहण्याची जनसेवा ग्रंथालयाची कल्पना आहे. त्यानिमित्त वाचक व लेखकांनी या मान्यवरांची ओळख करून देणारे लेख वा माहिती पाठविण्याचे आवाहन जनसेवा ग्रंथालयाने केले आहे. 

योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, कथाकार अरविंद गोखले, संगीतकार स्नेहल भाटकर, गायक सुधीर फडके, वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई, कवी विंदा करंदीकर, साहित्यिक डॉ. वि. रा. करंदीकर, अमृता प्रीतम, कुलगुरू व लेखक देवदत्त दाभोळकर, आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर, अभिनेते शरद तळवलकर, साहित्यिक पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ संपादक अनंत भालेराव, संगीतकार नौशाद यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या मान्यवरांची माहिती किंवा परिचय देणारे, त्यांचा कार्यवृत्तांत सांगणारे, किस्से, आठवणी सांगणारे लेख २५० ते ३०० शब्दांत ३० सप्टेंबर २०१८पर्यंत जनसेवा ग्रंथालयाकडे टपालाने वा स्वहस्ते आणून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादक मंडळाच्या निर्णयानुसार लेखांची निवड केली जाईल आणि जनसेवा ग्रंथालयाच्या ‘शब्दांकुर-१८’ या हस्तलिखितात त्यांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे. आपले साहित्य ‘जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मी चौक – रत्नागिरी - ४१५६१२’ या पत्त्यावर पाठवावे, असे जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी कळवले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search