Next
‘महावितरणच्या माध्यमातून ग्राहकांची सेवा करण्याची संधी’
नागेश शिंदे
Friday, May 03, 2019 | 04:28 PM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : ‘मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याला कुठल्या, तरी कामाची जबाबदारी. अशीच एक जबाबदारी महावितरण कंपनीच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे ग्रामीण भागातील जनतेची सेवा बजावण्याची संधी आज परिपूर्ण झाली असून, जनतेच्या सहकार्यामुळेच आज सेवानिवृत्तीबद्दल महावितरणकडून परिवाराचा गौरव होत आहे,’ अशी भावना लाइनमन मुकुंद सुरोशे यांनी व्यक्त केली.

तालुक्यातील कारला येथील रहिवाशी असलेले सुरोशे यांनी ३५ वर्षांहून अधिक काळ तालुक्यासह अन्य गावांत आपली सेवा बजावली असून, ३० एप्रिल २०१९ रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त महावितरण कंपनीतर्फे सुरोशे यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

सुरोशे म्हणाले, ‘अंत्यत हलाखीच्या परिस्थीवर मात करून महावितरणमध्ये लाइनमन म्हणून काम केले. वीज ग्राहकांशी सलोख्याने राहून सतत ३५ वर्षे सेवा केली. यात त्यांचे सहकार्य लाभले. त्या मेहनतीचे यश म्हणजे महावितरणकडून आज होत असलेला हा गौरव आहे. आजच्या तरुण लाइनमननीदेखील जनतेशी सलोखा ठेवून काम केले, तर नक्कीच सेवानिवृत्त म्हणून यशस्वी व्हाल.’

या वेळी अभियंता राठोड, टिकार, ननावरे, डॉ. गफार, कबनुरे पाटील, वानखेडे पाटील, ढाणकीकर, गोपीनाथ पाटील, मारोती लुम्दे, नाथा पाटील, भुराजी धनवे, सोपान बोंपिलवार, जांबुवंत मिराशे, लाइनमन वाघमारे, मधुकर घोडगे, रजाक भाई, गंगाराम रासमवाड, आडेलू चपलवाड, आनंद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search