Next
‘एचडीएफसी’तर्फे वाहन विमा हप्त्यात कपात
प्रेस रिलीज
Tuesday, February 06 | 04:48 PM
15 0 0
Share this story

मुंबई : एचडीएफसी ईआरजीओ या भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बिगर जीवन विमा पुरवठादार कंपनीने वाहन विम्याच्या हप्त्यात फेरबदल करण्याची घोषणा केली. हे फेरबदल संपूर्ण भारतातील विद्यमान आणि नव्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतील, त्यांच्या खात्यातील हप्त्यात १५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

जीएसटीच्या अंमलबजावणीतील परिणामांमुळे दरात सुसंगतता आल्याने, दरांच्या अनुकूलतेतील पुढाकार आणि कंपनीने स्वीकारलेली सुधारित स्वयंचलित प्रक्रिया यांमुळे किंमतीतील हे फेरबदल पथ्यावर पडले आहेत. ज्याचे फायदे ग्राहकांना दिले जाणार आहेत.

या नव्या मूल्य निर्धारणेतील पुढाकाराबाबत बोलताना एचडीएफसी ईआरजीओ जनरल इन्शुरन्स कंपनीचे कार्यकारी संचालक मुकेश कुमार म्हणाले, ‘एचडीएफसी ईआरजीओसाठी ग्राहकांच्या आवडी या मुख्यत्वे महत्त्वाच्या आहेत, ज्यात आम्ही स्वयंचलनाद्वारे (ऑटोमेशन) आणि आमच्या प्रक्रियेतील बदलांद्वारे सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. या विचारासह, आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की या पुढाकारातून मिळणारा फायदा आम्ही आमच्या अमूल्य ग्राहकांना वाहन विम्याच्या हप्त्यात सध्याच्या दरावर १५ टक्के कपात देऊन देत आहोत.’

गेल्या काही वर्षांत एचडीएफसी ईआरजीओने नवे तंत्रज्ञान सादर करून किंवा सहज सोप्या प्रक्रियेद्वारे ग्राहकांना अनुकूल वापरकर्ता बनवून निरनिराळे फायदे दिले आहेत. ग्राहकांना कोणत्याही प्रत्यक्ष कागदपत्रे आणि चाचणीशिवाय त्यांच्या वाहन विमा पॉलिसीच्या नुतनीकरणासाठी नुकतेच सादर झालेले स्वयं तपासणी अॅप्लिकेशन (सेल्फ इन्स्पेक्शन अॅप्लिकेशन) फायदेशीर ठरले. त्याद्वारे पॉलिसी जारी करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यास मदत झाली. शिवाय, कंपनी आपल्या ग्राहकांना संपूर्ण भारतातील पाच हजार ३०० गॅरेजच्या नेटवर्कचा वापर करण्याची संधीही देते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link