Next
‘टाटा'च्या छोट्या व्यावसायिक वाहनांवर तिहेरी सवलत
दिवाळीनिमित्त ‘तीन का त्योहार’ योजना
प्रेस रिलीज
Monday, November 05 | 04:13 PM
15 0 0
Share this story

मुंबई : टाटा मोटर्सने ‘टाटा एस’ या गाड्यांची २० लाखांहून अधिक विक्री केली असून, हे यश साजरे करण्यासाठी कंपनीकडून ‘तीन का त्योहार’ ही नवी योजना सादर करण्यात आली आहे. यात कंपनीने छोट्या व्यावसायिक गाड्यांच्या ग्राहकांसाठी तीन सवलतींची घोषणा केली आहे.


यंदाच्या सणांत खरेदी केलेल्या टाटा मोटर्सच्या प्रत्येक छोट्या व्यावसायिक वाहनावर  (एससीव्ही) ग्राहकाला एक मोफत सोन्याचे नाणे, १० लाखांचा वैयक्तिक विमा आणि आकर्षक मासिक ग्राहक योजना जिंकण्याची संधी मिळणार आहे. वाहनाची खरेदी कोणत्या भागात होते त्यावर योजना अवलंबून असेल. नव्याने सादर करण्यात आलेल्या ‘टाटा एस’ गोल्डसह व्यावसायिक वाहनांच्या संपूर्ण ‘एससीव्ही’ रेंजवर ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत ही योजना लागू आहे.

या मोहिमेबद्दल बोलताना ‘टाटा मोटर्स’च्या विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख आर. टी. वासन म्हणाले, ‘२००५मध्ये सादर झाल्यापासून ‘टाटा एस’ने भारतातील ‘एससीव्ही’ विभागाचे नेतृत्वस्थान पटकावले आहेच. त्याचबरोबर हजारो व्यावसायिकांना ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टीक क्षेत्रात आपल्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात साह्य केले आहे. दर तिसऱ्या मिनिटाला टाटा एसची एक गाडी विकली जाण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठताना आम्ही नव्या ग्राहकांना विविध सवलती देऊन हे यश साजरे करण्याचे ठरवले. या मोहिमेच्या नुसत्या चर्चेनेही शोरूमला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. येणारे सणांचे दिवस आणि पुढील दोन महिन्यांत खरेदी केल्या जाणाऱ्या प्रत्येक ‘एससीव्ही’वर ‘टाटा मोटर्स’तर्फे दिल्या जाणाऱ्या आकर्षक सवलतींमुळे विक्रीत वाढ होईल, अशी आशा आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link