Next
अरुण दाते यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, May 02 | 03:22 PM
15 0 0
Share this story

अरुण दाते
पुणे : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त माणिक एंटरटेनमेंट निर्मित आणि अतुल दाते प्रस्तुत ‘हात तुझा हातातून’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी, चार मे रोजी सायंकाळी पाच वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तीन पिढ्यांची गायकी एकत्र अनुभवायला मिळणार आहे. 

या कार्यक्रमात गायक मंदार आपटे, श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, पौर्णिमा आडगांवकर, प्रज्ञा देशपांडे सादरीकरण करणार आहेत. शरयु दाते आणि अनुराधा कुबेर यांचा विशेष सहभाग असणार आहे. याचबरोबर कुमार गंधर्व, सुधीर फडके, सुरेश वाडकर तसेच बेगम अख्तर, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, लता मंगेशकर, आशा भोसले, अशा दिग्गजांची सदाबहार गाणी व अरुण दाते यांची नऊ युगुलगीते ऐकायला मिळणार आहेत. 
अनुश्री फडणीस कार्यक्रमाचे निवेदन करतील, तर अतुल दाते संवादकाची भूमिका पार पाडतील.


कार्यक्रमाविषयी -
‘हात तुझा हातातून’कार्यक्रम
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड  
वेळ : शुक्रवार, ४ मे, सायंकाळी पाच वाजता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link