Next
पॅरलल वायरलेसचे अत्याधुनिक केंद्र पुण्यात स्थापन
पश्चिम भारतासाठीचे सर्वांत मोठे केंद्र
प्रेस रिलीज
Friday, September 20, 2019 | 03:33 PM
15 0 0
Share this article:

पॅरलल वायरलेसच्या पुण्यातील केंद्राचे उद्घाटन करताना सहसंस्थापक केतकी अगरवाल व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कीथ जॉन्सन,

पुणे : पॅरलल वायरलेस आयएनसी या ओपनरॅन सोल्युशन्स (फाइव्ह जी, फोर जी, थ्री जी, टू जी आणि वायफाय तंत्रज्ञान) देणाऱ्या अमेरिकास्थित कंपनीने आपले पश्चिम भारतासाठीचे सर्वांत मोठे केंद्र पुण्यात सुरू केले आहे. पॅरलल वायरलेसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कीथ जॉन्सन यांच्या हस्ते नुकतेच या केंद्राचे उद्घाटन झाले. या वेळी सहसंस्थापक केतकी अगरवाल, संजय हरवाणी, अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.  

‘पाच जागतिक मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्या पॅरलल वायरलेस ओपनरॅन सोल्युशन्स अवलंबण्यासाठी चाचण्या घेत असून, त्यांना सेवा देण्याचे काम या केंद्राद्वारे केले जाणार आहे. तब्बल ३१ हजार २०० चौरस फूट क्षेत्रावर पसरलेल्या या केंद्रात आणखी ४० टक्के कर्मचारी संख्या वाढवता येणार आहे. यामुळे फाइव्ह जी नेटवर्क उपलब्ध करण्याबरोबर नेटवर्क अधिक अत्याधुनिक करण्याच्या धोरणाला गती मिळेल, तसेच वार्षिक ५० टक्के वाढीचे उद्दिष्ट गाठणे कंपनीला शक्य होईल,’असे कीथ जॉन्सन यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘आमचे कर्मचारी ही आमची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि कटिबद्धतेमुळे आम्ही ओपनरॅन सोल्युशन्सचे आघाडीचे पुरवठादार बनलो आहोत. आमच्या कर्मचाऱ्यांना सर्वोत्कृष्ट वातावरण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमचे पुण्यातील हे नवे केंद्र याच तत्त्वावर आधारित आहे. कामकाजाच्या ठिकाणाचे वातावरण चांगले ठेवण्यासाठी काम आणि खासगी आयुष्य यांचे संतुलन आणि त्यांना उत्कृष्ट कामगिरी बजावता यावी यासाठी आम्ही नेहमीच पाठबळ देत राहू.’पॅरलल वायरलेसच्या इंजिनीअरिंग विभागाचे उपाध्यक्ष संजय हरवाणी म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांची सकारात्मक मानसिकता जपणे हे आमचे मुख्य तत्त्व आहे. आमच्या कंपनीतील ६० टक्के भारती ही रेफरन्समधून होते. काम आणि आयुष्य यांचे संतुलन साधण्यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांना नेहमीच पाठबळ देतो, त्यामुळे आमच्याकडे काम करण्यास उत्सुक असणाऱ्यांची संख्या मोठी आहे, तसेच कंपनी सोडून जाणाऱ्यांचे प्रमाणही कमी आहे. आम्ही कर्मचारी संख्या वाढवत असून, पात्र उमेदवारांना आमच्या वेबसाइटवर अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.’  

या अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या केंद्रात सुसज्ज प्रयोगशाळेसह सर्व त्या सोयी सुविधा असून, कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उत्तम वातावरण आहे. या केंद्रात विकास केंद्र, दर्जा हमी विभाग आणि सिस्टीम इंजिनीअरिंग असे तीन विभाग आहेत. सर्वांमधील समन्वय वाढावा या दृष्टीने या नवीन कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. पॅरलल वायरलेसचे हे केंद्र नाविन्यपूर्ण उत्पादन आणि ओपनरॅन सोल्युशन्सच्या विकसनावर भर देणार आहे. पॅरलल वायरलेसचे नावीन्यपूर्ण, स्वस्त आणि बहुआयामी ओपनरॅन सोल्युशन दूरसंचार कंपन्यांना सॉफ्टवेअर आधारित आधुनिक तंत्रज्ञान किफायतशीरपणे उपलब्ध करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. सहा खंडांमधील अनेक आघाडीच्या कंपन्या पॅरलल वायरलेसच्या ग्राहक असून, यात टेलिफोनिका, एमटीएन, व्होडाफोन, सेलकॉम, ऑप्टस, इनलँड सेल्युलर, झेन आदींचा समावेश आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search