Next
गोव्यातल्या दैवज्ञ ब्राह्मण पाककृती
प्रसन्न पेठे
Wednesday, July 11, 2018 | 05:13 PM
15 0 0
Share this story

पाककृतींवर अनेक पुस्तकं बाजारात असताना, गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण समाजातल्या विशिष्ट पदार्थांच्या पाककृती देणारं आणि त्यामुळे तिथल्या भाषेतल्या पदार्थांच्या नावांपासून वेगळेपणा जपणारं ‘गोमंत रुचिरा’ हे पुस्तक रिया लोटलीकर यांनी लिहून तब्बल २५५ पदार्थांची ओळख वाचकांना करून दिली आहे. या पुस्तकाचा हा परिचय...    
..............
गोव्यामध्ये वेगवेगळ्या समाजातली माणसं राहतात. त्यांच्या भाषिक वेगळेपणाइतक्याच त्यांच्या स्वयंपाकाच्या पद्धतीही भिन्न आहेत. प्रत्येक समाजात पूर्वापार चालत आलेल्या चालीरीतींची आणि पदार्थाच्या नावांची खास स्वतःची अशी एक खुमारीही आहे. रिया लोटलीकर ह्या दैवज्ञ ब्राह्मण समाजातल्या. त्यांनी त्यांच्याकडच्या पद्धतीप्रमाणे या सर्व पाककृती लिहिल्या आहेत आणि म्हणून त्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 

पुस्तकाच्या पहिल्या भागात नाश्त्यासाठी बनवल्या जाणाऱ्या ३३ पदार्थांच्या पाककृती आहेत. शिऱ्याच्या प्रकारात गोड, तिखट शिऱ्यापासून ते लापशीच्या आणि पावाच्या शिऱ्यापर्यंत कृती आहेत. गंमत म्हणजे एकीकडे सँडविच, भाकरी, अप्पम, इडली, पुरीच्या पाककृती देतानाच दुसरीकडे चक्क चहाच्या सहा प्रकारांच्या पाककृतीसुद्धा दिल्या आहेत.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात १०१ व्हेजिटेरियन डिशेसच्या पाककृती आहेत. त्यात खास दैवज्ञ ब्राह्मण पद्धतीच्या धवो रोस, कुवोळ, आळेन, भेंड्याचे हुमण, हिरवे सांसव, कडवण, खतखते, किल्लाचे तोंडाक, तायखिळ्याची भाजी, खरमटे अशा अनेक पदार्थांची माहिती आहे.
 
पुस्तकाचा तिसरा भाग हा खास नॉन-व्हेजिटेरियन आवडणाऱ्या मंडळींसाठी. यामध्ये हुमणाचे १४ प्रकार, कालवणाचे चार-पाच प्रकार, शागुतीचे चार प्रकार आणि माशाच्या, खेकड्याच्या, आणि सुकं बोंबील, सुकं शिलाणं, सुका बांगडा, सुकी तारली अशा रेसिपीज दिल्या आहेत. 

चौथ्या आणि शेवटच्या सेक्शनमध्ये ७० प्रकारच्या गोड पदार्थांचा भरणा आहे. यात अगदी दुधातल्या पोह्यापासून ते तोतापुरी आंब्यांच्या लोणच्यापर्यंत आणि तवसळी, शिरवळ्या, पातोळ्यापासून ते हलवे, सरबतं आणि खास तिखट पोह्यांपर्यंत अनेक पदार्थांचा समावेश आहे.     

हे नक्कीच एक इंटरेस्टिंग पुस्तक आहे.   

पुस्तक : गोमंत रुचिरा       
लेखक : रिया मोतीलाल लोटलीकर       
प्रकाशक : संजना पब्लिकेशन्स, दत्तवाडी, सांगे, गोवा ४०३ ७०४    
संपर्क : ७७०९० ६७८७९ 
पृष्ठे : १४३  
मूल्य : १५० ₹ 

(‘गोमंत रुचिरा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link