Next
‘डॉक्टर्स डे’निमित्त परिसंवादाचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, June 27, 2018 | 01:01 PM
15 0 0
Share this story

पुणे ​: सरकारी रुग्णालयांवरील वाढता भार आणि सुविधांची कमतरता, खासगी रुग्णालयांची ‘तद्दन व्यावसायिक’ अशी तयार झालेली ओळख, डॉक्टर आणि रुग्णांमध्ये वाढत चाललेले अंतर आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण करण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांच्या या पार्श्वभूमीवर पी. एम. शहा फाउंडेशनतर्फे जन आरोग्य मंच, पुणे सिटिझन-डॉक्टर फोरम आणि वर्धमान प्रतिष्ठानच्या सहकार्याने एका विशेष परिसंवादाचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या पूर्वसंध्येला ३० जून २०१८ रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

शहा फाउंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी यांनी ही माहिती दिली. सेनापती बापट रस्त्यावर सिंबायोसिस महाविद्यालयाजवळ असलेल्या वर्धमान प्रतिष्ठान येथे दुपारी चार वाजता होणाऱ्या या परिसंवादात ‘डॉक्टरांवर होणारे हल्ले! अपराधी नक्की कोण?’ हा विषय चर्चिला जाणार आहे.

पुणे सिटिझन-डॉक्टर फोरमचे सदस्य व कार्यकर्ते डॉ. अरुण गद्रे, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. जयंत नवरंगे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्सचे (मार्ड) महासचिव डॉ. अजय वने आणि ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे हे या वेळी आपली मते मांडणार आहेत. अॅड. चेतन गांधी आणि डॉ. ज्ञानेश्वर मोटे हे या सत्राचे संवादक असतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

परिसंवादाविषयी :
दिवस :
शनिवार, ३० जून २०१८
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : वर्धमान प्रतिष्ठान, सिंबायोसिस महाविद्यालयाजवळ, सेनापती बापट रस्ता, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link