Next
‘अनुलोम’तर्फे स्वच्छता आणि दुरुस्ती अभियान
BOI
Friday, December 01, 2017 | 03:21 PM
15 0 0
Share this article:

साखरपा (रत्नागिरी) : अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) आणि कोंडगाव येथील श्रीराम देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने कोंडगाव येथे स्मशानभूमी स्वच्छता आणि दुरुस्ती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त आणि कोंडगावचे नूतन सरपंच बापूसाहेब शेट्ये, सदस्य मितेश गांधी आणि नेत्रा शिंदे उपस्थित होते. सुरुवातीला श्रीराम देवस्थाने अध्यक्ष अमित केतकर यांनी ‘अनुलोम’च्या कार्याबद्दल माहिती देऊन संस्थेमार्फत कोंडगाव परिसरात असे उपक्रम राबवण्याचा मानस ही व्यक्त केला.

सरपंच शेट्ये यांनी श्रीफळ वाढवून स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचे उद्घाटन केले. ‘कोंडगावमध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबविताना आज खऱ्या अर्थाने श्रीराम देवस्थान आणि ‘अनुलोम’ यांनी स्वच्छतेचा चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल आभार मानतो,’ असे शेट्ये यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. गावाच्या सेवेसाठी कोणत्याही प्रकारच्या राजकारणाला थारा देणार नसल्याचे शेट्ये यांनी या वेळी सांगितले.

डॉ. गजानन केतकर, डॉ. यशवंत पोंक्षे, शंकर अभ्यंकर, चिंतामण फडके, शेखर अभ्यंकर, मंगेश मोभारकर, श्री. राइन, कांचन जोगळेकर, प्रल्हाद केतकर, सुरेश गांधी, सुहास साळवी या वेळी उपस्थित होते. या उपक्रमाला सुभाष लोटणकर (चव्हाण) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा उपक्रम मोभारकर यांच्या संकल्पनेतून साकार झाल्याने देवस्थानतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अमित गजानन केतकर About
असे छोटे छोटे उपक्रम राबवण्याची इच्छा आहे प्रसिद्धी बद्दल आभार
0
0

Select Language
Share Link
 
Search