Next
‘पालकच मुलांचे खरे मार्गदर्शक’
राजीव तांबे यांचे मत
BOI
Tuesday, December 18, 2018 | 03:44 PM
15 0 0
Share this story

गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘आय पेरेंट्स’ कार्यक्रमात डॉ. राजीव तांबे यांचा सत्कार करताना मुख्याध्यापिका भारती भागवाणी

पुणे : ‘लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी त्यांना आत्मविश्वासाची आवश्यकता असते. पालकांनी मुलांच्या या वाढत्या वयात त्यांच्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणे अत्यंत महत्त्वाचे असते’, असे मत डॉ. राजीव तांबे यांनी व्यक्त केले. गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘आय पेरेंट्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांना मार्गदर्शनही केले. 

गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी, इतर पालक आणि शिक्षकही या वेळी उपस्थित होते.  

तांबे पुढे म्हणाले, ‘पालकांनी मुलांना छोटे, मोठे काम करण्याची सूट दिली पाहिजे. त्यांना स्वत:ची कामे करू दिली पाहिजेत.  मुलांना त्यांचा निर्णय स्वत:ला घेऊ द्यावेत;मात्र त्यांच्या योग्य-अयोग्य निर्णयावर लक्ष ठेवावे. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास, तर वाढेलच शिवाय त्यांची निर्णयक्षमताही वाढीस लागेल.चूक झाल्यानंतर शिक्षा न करता मुलांना समज देऊन त्यांना त्यांची चूक सुधारण्यास मदत केली पाहिजे. त्यामुळे भविष्यात त्यांच्याकडून पुन्हा ती चूक होणार नाही. ही गोष्ट त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.’ 

‘मुलांवर आपण कळत-नकळत आपल्या अपेक्षांचे ओझे लादत आहोत, हे आपण विसरून जातो. तसे न करता त्यांचे ऐकून घेणे, त्यांना समजून घेणे जास्त आवश्यक आहे’, असे मत सोनू गुप्ता यांनी व्यक्त केले.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link