Next
५५ विद्यार्थ्यांनी केले रंगतदार तबलावादन
BOI
Wednesday, January 16, 2019 | 12:24 PM
15 0 0
Share this story

पं. नचिकेत मेहेंदळे यांच्या ‘मधुमती संगीत विद्यालया’तर्फे नुकतीच तबलावादन मैफल सादर झाली. यात त्यांच्या ५५ विद्यार्थ्यांनी तबलावादन सादर केले.

पुणे : ज्येष्ठ तबलावादक तालभूषण पं. नचिकेत मेहेंदळे यांच्या ‘मधुमती संगीत विद्यालया’तर्फे नुकतीच तबलावादन मैफल सादर झाली. यात त्यांच्या ५५ विद्यार्थ्यांनी रंगतदार तबलावादन सादर केले. सदाशिव पेठेतील व्यास मंदिर येथे हा कार्यक्रम झाला. 


प्रथम कार्यक्रमाची सुरुवात निवेदिता मेहेंदळे यांनी रचलेल्या ‘देवी शारदे’ या सरस्वतीस्तवनाने झाली. तन्मयी मेहेंदळे हिने याचे गायन केले. नचिकेत मेहेंदळे यांनी तबला साथ केली; तसेच या वेळी सोळा मात्रांच्या तीनतालात सिद्धी कराडकर,विश्वसेन होसूर, सौमित्र देवधर, अमेय मराठे, अथर्व जोशी, ओंकार जोशी आदी एकूण ३३ विद्यार्थ्यांनी चार गटात सामुहिक वादन केले. यामध्ये कायदे, रेले, परण, चक्रधार, मुखडे, तुकडे यांचे दमदार सादरीकरण झाले. 

‘मधुमती संगीत विद्यालया’तर्फे आयोजित तबलावादन मैफलीस ज्येष्ठ उद्योजक संपतलाल गादिया, ज्येष्ठ तबला वादक पं. विजय दास्ताने आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर ताल झपतालमध्ये मानस भावे, कैवल्य देशपांडे, रिषभ खळदकर, कुणाल निरगुडकर, पंचम परदेशी, सोहम जोशी यांनी सामुहिक वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर रमेश मंगळूरकर यांनी तीनतालात स्वतंत्र तबलावादन केले. यानंतर तन्मयी मेहेंदळे यांनी ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ हा अभंग सादर केला. त्यानंतर सिद्धेश साठे आणि ओंकार देवकुळे यांनी तीनतालात अतिशय अभ्यासपूर्ण वादन सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर वाजवण्यास अतिशय अवघड अशा १५ मात्रांच्या पंचम सवारी तालातील वादन मेहुल गादिया आणि निखिल बोऱ्हाडे यांनी केले. त्यांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यानंतर हेमंत गोडबोले आणि हृषीकेश खाडे यांनी तीनतालात वादन सादर केले. 


या वेळी संपतलाल गादिया यांच्यातर्फे पं. नचिकेत मेहेंदळे यांचा सत्कार करण्यात आला;तसेच पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार सुनीत भावे यांचाही सत्कार करण्यात आला. 

सर्व विदयार्थ्यांना लेहेऱ्याची साथसांगत हार्मोनियमवर पं. प्रमोद मराठे यांचे शिष्य देवेंद्र देशपांडे यांनी केली. मैफलीचे सूत्रसंचालन तन्मयी मेहेंदळे यांनी केले. या मैफलीस सुनीत भावे, ज्येष्ठ उद्योजक संपतलाल गादिया, ज्येष्ठ तबला वादक पं. विजय दास्ताने यांची विशेष उपस्थिती लाभली. मैफलीची सांगता पसायदानाने झाली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link