Next
‘स्मार्ट्रोन’च्या ‘टी-बुक फ्लेक्स’चे अनावरण
प्रेस रिलीज
Friday, May 11 | 12:21 PM
15 0 0
Share this story

पुणे : स्मार्ट्रोन या भारतातील पहिल्या जागतिक तंत्रज्ञानावर आधारित ओईएमने तसेच आघाडीच्या आयओटी ब्रॅंडने त्यांच्या आणखी प्रगत बहुकार्यात्मक हायपर लॅपटॉप ‘टी-बुक फ्लेक्स’ची घोषणा केली. टू-इन-वन लॅपटॉप्समधील सर्व वैशिष्ट्ये आणि सुविधा एकत्र आणून, ती टी-बुक फ्लेक्सच्या स्वरूपात आकर्षक किंमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. टी-बुक फ्लेक्सची एमथ्री आणि आयफाय ही व्हर्जन्स अनुक्रमे ४२ हजार ९९० रुपये आणि ५२ हजार ९९० रुपयांना, १३ मे २०१८च्या मध्यरात्रीपासून केवळ फ्लिपकार्डवर उपलब्ध आहेत.

टी-बुक फ्लेक्सचे लाँच अभियान ‘#TheFlexperience’ मध्ये या उपकरणाच्या लवचिकतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. याचा उपयोग काम आणि मनोरंजन या दोहोंसाठी अत्यंत सुलभतेने करता येतो. मग ते गेम ऑफ थ्रोन्सचा एखादा एपिसोड बघणे असो, पॉप होणाऱ्या ई-मेलला झटपट उत्तर देता येणे असो किंवा टॅब्लेट मोडवर तुमचा आवडता गेम खेळणे असो, हे सगळे आलटून पालटून करणे टी-बुक फ्लेक्सवर अत्यंत सोयीस्कर आहे. सतत काहीतरी करत असलेल्यांसाठी, तसेच अधिक गतीशीलता, उत्पादकता आणि कामगिरीसाठी बहुपयोगी व बहुकार्यात्मक लॅपटॉपची गरज असलेल्यांसाठी टी-बुक फ्लेक्स डिझाइन करण्यात आला आहे.

या लॅपटॉपचे डिझाइन वेगळे असून, १२.२ इंचांचा डब्ल्यूक्यूएक्सजीए डिसप्ले, २५६०x१६०० रिझोल्यूशन यामुळे वापरकर्त्याला उत्कृष्ट असा मल्टिमीडिया अनुभव मिळतो. मल्टि-टच डिस्प्ले बोटांच्या स्पर्शाला, तसेच स्टायलस पेनला अचूक प्रतिसाद देतो. या चकाकत्या डिसप्लेला फ्रंट आणि रिअर कॅमेरा, ड्युअल मिक, ताकदीचे स्पीकर्स, वेगवान ड्युअल-बॅंड वायफायची जोड मिळाल्यानेहा लॅपटॉप मल्टिमीडियासाठी उत्तम पर्याय ठरतो.

याची ड्युअल टोन फिनिश आणि फ्लिक्सस्टॅंडसह सपाट हिंज डिझाइन तसेच १५० अंशात वळण्याची क्षमता यामुळे हा लॅपटॉप वेगळा उठून दिसतो. आयलंड स्टाइल, बॅकलिट, की-बोर्ड, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी या सर्व वैशिष्ट्यांमुळे तुम्ही अगदी कमी अंतर ठेवून, तसेच अगदी कमी प्रकाशातही यावर टायपिंग करू शकता.

कमी वजनाची बॉडी आणि डिटॅचेबल बॅकलिट कीबोर्ड यांमुळे टी-बुक फ्लेक्स इकडून तिकडे हलवणे अत्यंत सोपे आहे. या हायपर लॅपटॉपला वेगवान फिंगरप्रिंट स्कॅनर असून, यामुळे महत्त्वाची डॉक्युमेंट्स सुरक्षित राहतात आणि पटकन बघताही येतात. उपकरणात अत्याधुनिक थंडरबोल्ट थ्री यूएसबी टाइप सी पोर्ट असून, यामुळे ४० जीबीपीएस वेगाने डेटा ट्रान्स्फर करता येतो, मल्टिपल हाय-रिझोल्युशन डिस्प्लेवर तो प्रोजेक्ट करया येतो आणि बाह्य जीपीयूही सहज कनेक्ट करता येते.

एवढेच नाही तर, या लॅपटॉपमध्ये टाइप सी जलद चार्जिंगचीही सोय आहे. त्यामुळे घाईत असतानाही लॅपटॉप वेगाने आणि पुरेसा चार्ज होईल याची खात्री आहे. ‘स्मार्ट्रोन’च्या अगोदरच्या टी-बुकची सर्व वैशिष्ट्ये आणखी पुढील स्तरावर नेणारा हा टी-बुक फ्लेक्स ऑरेंज-ग्रे आणि ब्लॅक-ग्रे अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

विशेषत: हायब्रिड्सना डोळ्यापुढे ठेवून डिझाइन करण्यात आलेले विंडोज टेन टी-बुक फ्लेक्समध्ये देण्यात असून, यामुळे लॅपटॉप आणि टॅब्लेट यांच्यातील सांधेबदल अत्यंत सुलभ रितीने होतो. कोर्टाना, विंडोज इंक, जेस्चर्स आणि विंडोज टेनसोबत येणाऱ्या आणखी अनेक आकर्षक सुविधा टी-बुकमध्ये अंतर्भूत आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link