Next
वि. भि. कोलते, श्री. भि. वेलणकर
BOI
Friday, June 22 | 03:45 AM
15 0 0
Share this story

संतसाहित्याचे अभ्यासक वि. भि. कोलते आणि भारतीय टपाल सेवेतल्या नोकरीदरम्यान पिनकोड प्रणाली आणणारे श्री. भि. वेलणकर यांचा २२ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...... 
विष्णू भिकाजी कोलते 

२२ जून १९०८ रोजी नाखल्यामध्ये जन्मलेले विष्णू भिकाजी कोलते हे संतसाहित्याचे संशोधक म्हणून ओळखले जातात. महानुभाव साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलं होतं. 

मराठी संतांचे सामाजिक कार्य, लव्हाळी, स्वस्तिक, मूर्तिप्रकाश, साहित्य संचार, प्राचीन मराठी साहित्य संशोधन, मराठी अस्मितेचा शोध, स्नेहबंध, गिरिपर्ण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
 
१९६७ सालच्या भोपाळ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. 

आठ एप्रिल १९९८ रोजी त्यांचं निधन झालं.

(वि. भि. कोलते यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
..........

श्रीराम भिकाजी वेलणकर 
२२ जून १९१५ रोजी जन्मलेले श्रीराम भिकाजी वेलणकर हे संस्कृत पंडित, कवी आणि अनुवादक होते. त्यांनी भारतीय टपाल खात्यासाठी ‘पिनकोड’ ही प्रणाली तयार केली होती आणि ती १५ ऑगस्ट १९७२पासून अंमलात आणली गेली. 

राधामाधव, प्रणयधारा, स्मरणसुधा, प्राचीन भारतीय भौतिक विज्ञान, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक मराठी नाटकांचे संस्कृतमध्ये अनुवाद केले होते. संस्कृतमधल्या योगदानासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. 

एक एप्रिल १९९९ रोजी त्यांचं निधन झालं. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link