Next
‘रिंगरोड परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित करावे’
प्रेस रिलीज
Friday, March 09, 2018 | 12:20 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पुणे आणि परिसरात होत असलेल्या रिंगरोडचे प्रत्यक्ष काम नजीकच्या भविष्यात सुरू होणार असून यादरम्यान बांधकाम व्यावसायिकांनी या भागात आपले लक्ष केंद्रित करीत त्या भागाच्या विकासासाठी योगदान द्यावे’, असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएचे आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी क्रेडाई सभासदांना केले. गित्ते यांनी नुकतेच क्रेडाई पुणे मेट्रोच्या सभासदांसमोर रिंगरोड आणि त्या अनुषंगाने होणारा शहराचा विकास या विषयावर सादरीकरण केले, त्या वेळी ते बोलत होते.

पीएमआरडीएचे आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते
‘कॉन्फडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, उपाध्यक्ष सुहास मर्चंट, किशोर पाटे व अनिल फरांदे , नॅशनल क्रेडाई युथ विंगचे समन्वयक आदित्य जावडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

याबद्दल अधिक माहिती देताना गित्ते म्हणाले की, शहराच्या वाहतूककोंडीवर व जिल्ह्याच्या विकासासाठी रिंगरोड हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम हे लवकरच सुरू होणार असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. रिंगरोड हा एकूण १२८ कि.मी लांब व ११० मीटर रुंद असून त्यामध्ये ८ पदरी महामार्ग, सर्व्हिस रोड, नॅशनल हायवे जंक्शन यांचा समावेश असेल. टाउन प्लॅनिंग स्कीममधून रिंग रोड परिसरातील प्लॅन्ड डेव्हलपमेंटदेखील होणार आहे. यातून पुण्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. ९५ टक्के रिंगरोड हा  शहराच्या फक्त १० कि.मी दुरून जात असल्यामुळे विकास होण्याची खात्रीही आहे.  सहा टप्प्यांमध्ये असलेल्या या प्रकल्पाचे पहिले दोन टप्पे हे येत्या काही महिन्यात सुरु होतील. रिंगरोडलगत असलेल्या परिसरात टाउन प्लॅनिंग स्कीम्स नियोजित केल्या असून त्यामध्ये पीएमआरडीएच्यावतीने रस्ते, अमेनिटीज, पाणी आणि इतर आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जाणार असल्याने ते बांधकाम क्षेत्राला व नागरिकांना नक्कीच सोयीचे ठरेल.

‘रिंगरोड हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्पाएवढाच जास्त महत्त्वाचा असून याचा फायदा शहरातील नागरिकांबरोबरच बाहेरून येणा-या नागरिकांनाही नक्की होणार आहे. टाउन प्लॅनिंगमुळे शहरात होणारी वाहतुकीची होणारी कोंडी व प्रदूषण कमी होईल,’असे श्रीकांत परांजपे यांनी सांगितले.

रिंगरोडची फायनल अलाईनमेंट व बाधित क्षेत्र हे तातडीने सरकारला हॅण्डओव्हर करण्यासाठी सरकार व जमीन मालकांमध्ये करण्यात येणाऱ्या एमओयुचा ड्राफ्ट त्यांनी सादर केला. ‘लवकरात लवकर लँड अॅक्वॅझिशन पूर्ण करून रिंगरोड बांधकामाला गती देण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोकडून शक्य तेवढी मदत करू’, असे आश्वासनही त्यांनी दिले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link