Next
हम ना तुम्हे भुलायेंगे
BOI
Friday, November 23, 2018 | 09:46 AM
15 0 0
Share this story

भारतीय चित्रपटांच्या सुवर्णकाळात म्हणजे १९४५ ते १९७०-७१ मध्ये असामान्य संगीताने रसिकांचे कान तृप्त करणारे मराठी नाव म्हणजे रामचंद्र चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र. कधी अण्णासाहेब, कधी शामू या नावांनीही त्यांनी संगीत क्षेत्रात संचार केला. त्यांना जवळून पाहिलेल्या केतकी साळकर यांनी त्यांच्या गाण्यांच्या आठवणी ‘हम ना तुम्हे भुलायेंगे’मधून जागविल्या आहेत.

सी. रामचंद्र हे नाव घेऊन त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत अनोख्या संगीताने इतिहास घडविला. भारती व पाश्चात्य शास्त्रीय संगीतावरील प्रभुत्त्व आणि दोन्ही संगीताच्या स्वरलिपी लिखाणाचे ज्ञान यामुळे ते सगळ्याच संगीतकार व वादकांचे आवडते होते. १९३९मध्ये सी. रामचंद्र यांना सहाय्यक संगीतकाराची संधी मिळाली. तिथपासून त्यांच्या गाण्यांचा आढावा यात घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेते भगवान यांची मैत्री, त्यांच्या चित्रपटांना दिलेले अजरामर संगीत अशा अनेक आठवणीही सांगितल्या आहेत. प्रत्येक लेखात सी. रामचंद्र यांची अनेक गाजलेली गाणी व त्या अनुषंगाने आठवणी असून, शेवटी त्यात उल्लेख केलेल्या गाण्यांची, चित्रपटांची यू-ट्यूब लिंक दिली आहे.   
       
प्रकाशन : केतकी साळकर
पृष्ठे : १२८
मूल्य : १३५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link