Next
आठवी सातारा हिल हाफ मॅरेथॉन २५ ऑगस्टला
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटूंसह साडेआठ हजार जण धावणार; पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग
BOI
Friday, August 23, 2019 | 01:44 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘सातारा रनर्स फाउंडेशनतर्फे आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा येत्या रविवारी (२५ ऑगस्ट) होत असून, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटूंसह आठ हजार ५०० हून अधिक धावपटू साताऱ्यातील रस्त्यांवरुन धावणार आहेत. पुण्यातील जवळपास ८४२ धावपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत,’ अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव गोळे व सचिव जितेंद्र भोसले यांनी दिली.

‘ही मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यातील पोलिस कवायत मैदानावरुन सुरू होईल. पोलिस कवायत मैदान, पोवईनाका, कर्मवीर पथावरुन राजवाडामार्गे बोगदा व तेथून यवतेश्वर घाटाकडे तर परत येताना बोगदा, अदालतवाडा, नगरपालिका, रविवार पेठ पोलिस चौकीमार्गे कर्मवीर पथावरुन पोवई नाका व पुन्हा पोलिस कवायत मैदान  असा हा मार्ग असेल,’ अशी माहिती रेस डायरेक्टर डॉ. देवदत्त देव यांनी दिली.

 मॅरेथॉनविषयी बोलताना संस्थापक डॉ. संदीप काटे, डॉ. शेखर घोरपडे म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय दर्जाची ही मॅरेथॉन साताऱ्याचा मानबिंदू ठरली आहे. स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन, वाहतूक नियंत्रण कक्ष, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा नगरपालिका, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि वन विभाग यांनी आवश्यलक ते सर्व प्रशासकीय नियोजन केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ढाणेज् मेघा इंजिनीअरिंग क्लासेस, किराणा भुसार रिटेल व्यापारी संघटना, १०० केपी ग्रुप, महाराजा ग्रुप, सावकार इंजिनीअरिंग कॉलेज, विद्यार्थी वाहतूक सेवा संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वर्कफोर्स सोल्युशन सातारा, एस.के. करिअर ॲकॅडमी, शेंद्रे येथील कै. अभयसिंहराजे भोसले टेक्निकल इन्स्टिटयूट, कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ फिजिओथेरपी, कै.संजय भोसले स्मृती प्रतिष्ठान, जेष्ठ नागरिक संघ, प्रतिभा हॉस्पिटल, मीनाक्षी हॉस्पिटल स्टाफ, कन्याशाळेच्या विद्यार्थिनी, आयडीबीआय बँक निवृत्त कर्मचारी संघटना, महात्मा गांधी क्रीडा मंडळ, मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा इंग्लिश मीडियम स्कूल, तसेच विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनीदेखील कंबर कसली आहे.’ 

‘यवतेश्वर व सांबरवाडी येथील ग्रामस्थांनीदेखील पाहुण्यांची उत्तम व्यवस्था करण्यासाठी व पाहुण्यांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. साताऱ्यातील सर्व हॉटेल्स आणि लॉज, तसेच विविध कार्यालयांमध्येही स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे,’ असे उपाध्यक्ष डॉ. सुचित्रा काटे यांनी सांगितले.

‘स्पर्धकांना निवासाची व्यवस्था उपलब्ध न झाल्यास सातारकरांनी या पाहुण्या स्पर्धकांची निवास व्यवस्था आपल्या घरी करावी,’ असे आवाहनही काटे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search