Next
‘महिंद्रा’चा ‘ईपी१००’मध्ये सहभाग
प्रेस रिलीज
Thursday, September 13, 2018 | 10:15 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : उत्सर्जनामध्ये घट होण्याच्या दृष्टीने अवघ्या जगाचे लक्ष अवजड उद्योगाकडे लागले असताना, महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड, महिंद्रा हेव्ही इंजिन्स लिमिटेड यांनी ‘ईपी१००’मध्ये सहभागी होऊन, आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठीच्या धोरणाच्या केंद्रस्थानी ऊर्जाक्षमतेचा विचार करण्याची प्रतिज्ञा केली.

‘ईपी१००’ हा द क्लायमेट ग्रुपने अलायन्स टू सेव्ह एनर्जीच्या भागीदारीने ऊर्जा उत्पादकतेसाठी हाती घेतलेला जागतिक सहयोगात्मक उपक्रम आहे. महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करून व व्यवसायाच्या धोरणामध्ये ऊर्जाक्षमतेचा समावेश करून ‘ईपी१००’ सदस्य उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करत असतानाच, क्लीन टेक नाविन्यालाही चालना देत आहेत. ग्लोबल क्लायमेट अॅक्शन समिटच्या (१२ ते १४ सप्टेंबर) पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. या समिटमध्ये ‘महत्त्वाकांक्षेचा पुढील टप्पा गाठण्यासाठी’ सॅनफ्रान्सिस्को येथे एकत्र येणार असलेल्या व्यवसाय, राज्ये, प्रदेश व शहरे यातील व्यक्तींना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा मार्गदर्शन करणार आहेत.

द क्लायमेट ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हेलन क्लार्कसन म्हणाल्या, ‘ऊर्जेच्या वापरामध्ये बचत करण्याच्या हेतूने, ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन प्रयत्न करणार आहेत, ही कुतुहलाची व समाधानाची बाब आहे. ऑटो उत्पादनासारख्या क्षेत्रांमध्ये ऊर्जेचा होणारा वापर कमी करणे, हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे; परंतु आकडेवारी यावर योग्य स्पष्टीकरण देते. ऊर्जेचा योग्यप्रकारे वापर केल्यास अर्थकारणाला चालना मिळते व ग्रीनहाउस गॅस उत्सर्जनही कमी होते. या घोषणांमुळे अन्य अनेक व्यक्तींना सहभागी होण्यासाठी व स्वच्छ अर्थव्यवस्थेसाठी योगदान देण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.’

महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि.ने २०४१पर्यंत ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्याचे ठरवले आहे. महिंद्रा हेव्ही इंजिन्स लि.ने २०४१ पर्यंत ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्याचे ठरवले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा आणि महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लि. यांनी अगोदरच ‘ईपी१००’चे सदस्यत्व घेतले असून, त्यांनी सन २०१६मध्ये सहभाग नोंदवला. महिंद्रा अँड महिंद्रा या ऑटोमोटिव्ह व फार्मिंग इक्विपमेंट क्षेत्रांतील आघाडीवरील व १०० देशांतील २१ उद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीने आतापर्यंत जगभरातील एक हजार ७५७ ऊर्जाबचत प्रकल्पांमध्ये ४४.७ कोटी रुपये गुंतवले आहेत आणि गेल्या चार वर्षांत ८.३ केडब्ल्यूएच, ६७ टन ६५५ टन कार्बन उत्सर्जन व ६६.७ कोटी रुपयांची बचत केली आहे.

या विषयी बोलताना ‘एमअँडएम’ ऑटो डिव्हिजनचे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्सचे प्रमुख विजय कालरा म्हणाले, ‘ऊर्जेची कमतरता असलेल्या भारतासारख्या देशात व्यवसायाच्या शाश्वत कामगिरीच्या दृष्टीने ऊर्जा सुरक्षितता व उर्जेची किंमत अतिशय महत्त्वाची आहे. ‘ईपी१००’ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन, आम्ही आमचे कर्मचारी, समाज व देश यांप्रती बांधिलकी दर्शवली आहे. ऊर्जा उत्पादकता वाढवण्यासाठी आम्ही मोठमोठी उद्दिष्टे ठेवत असताना, आपण ज्या प्रकारे राहतो व काम करतो त्यामध्ये बदल करेल, असे नवे तंत्रज्ञान तयार व विकसित केले जाईल. व्यवसाय, कर्मचारी व समाज, या सर्वांसाठी फायदेशीर अशी स्थिती असणे महत्त्वाचे आहे.’

याबरोबरच, महिंद्रा इलेक्ट्रिक या महिंद्रा समूहातील कंपनीने इलेक्ट्रिक व्हेइकल्समध्ये (ईव्ही) परिवर्तन साधण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आणि २०३०पर्यंत इलेक्ट्रिक तत्त्वावरील वाहतूक सुरू होण्यासाठी बांधिलकी जपणाऱ्या कंपन्यांना एकत्र आणणाऱ्या ‘ईव्ही१००’ या जागतिक उपक्रमावर स्वाक्षरी केली आहे. महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लि. या समूहातील आणखी एका कंपनीने २०५०पर्यंत संपूर्ण जागतिक कार्यासाठी १०० टक्के अपारंपरिक ऊर्जा वापरण्याचे लक्ष्य ठेवत ‘आरई१००’साठी बांधिलकी दर्शवली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search