Next
र्‍हिदम वाघोलीकर यांना ‘महात्मा गांधी सन्मान’ जाहीर
प्रेस रिलीज
Monday, October 08, 2018 | 05:26 PM
15 0 0
Share this article:

पुणे : युवा लेखक र्‍हिदम वाघोलीकर यांना ग्लोबल अचिव्हर्स कॉनक्लेव्हच्या वतीने ‘महात्मा गांधी सन्मान’ जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार २५ ऑक्टोबर २०१८ रोजी ग्लोबल अचिव्हर्स कॉनक्लेव्ह दरम्यान लंडन ब्रिटीश पार्लमेंट (हाउस ऑफ कॉमन्स) येथे देण्यात येणार आहे. खासदार विरेंद्र शर्मा यांनी वाघोलीकर यांना कॉनक्लेव्हसाठी निमंत्रित केले आहे. ‘एनआरआय वेल्फेअर सोसायटी ऑफ इंडिया’ (लंडन) संस्थेतर्फे पुरस्कार वितरण होईल. जगभरातून ४५ नागरिकांना हा सन्मान दिला जातो. हा पुरस्कार मिळविणारे वाघोलीकर हे सर्वात तरुण भारतीय आहेत.  

वाघोलीकर हे सामाजिक विषयांवर जनजागृतीचे काम करणाऱ्या ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ स्वयंसेवी सेवी संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी ‘स्वरलता-र्‍हिदमिक रेमीनीसेस ऑफ लता दीदी’ या लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक तसेच किशोरीताईंवरील ‘द सोल स्टिरिन्ग व्हॉइस-गानसरस्वती किशोरी आमोणकर’ ही पुस्तके लिहिली आहेत.   

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर,  माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंडित बिरजू महाराज यांनी वाघोलीकर यांच्या लेखन उपक्रमाचे कौतुक केले आहे. याचबरोबर वाघोलीकर गौरी सावंत यांच्या समवेत अनाथ मुलींना मदतीचे सामाजिक कार्य करत आहेत.

वाघोलीकर यांना इस्मा इन्स्टिट्यूटतर्फे (इंटरनॅशनल स्पिरिच्युलिटी मार्केट) अध्यात्म क्षेत्रातील दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत; तसेच आसिआन थाई इंडियन बिझनेस लीडरशिप परिषदेत ‘युवा उद्योजक सन्मान’, ‘कला गौरव राष्ट्रीय पुरस्कार’, ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स’ पुरस्कार (दुबई), सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘फेमिना मोस्ट पॉवरफुल ऑफ द इअर २०१८’ पुरस्कार मिळाले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search