Next
नृत्य नाटिकेतून घडले स्त्री संतांच्या कार्याचे दर्शन
प्रेस रिलीज
Wednesday, January 23, 2019 | 03:04 PM
15 0 0
Share this story



पुणे : भारतीय विद्या भवन-इन्फोसिस फाउंडेशनच्या   सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत भारतीय कला केंद्र प्रस्तुत  ‘समर्पण’ या भरतनाट्यम नृत्य नाटिकेला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनच्या सरदार नातू सभागृहात नुकताच झाला. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.

संत कान्होपात्रा, संत मुक्ताई, संत जनाबाई या तीन स्त्री संतांची कार्याची रूपे मांडणारा हा आगळा वेगळा कार्यक्रम होता. मूळ संकल्पना अश्विनी एकबोटे यांची होती. याचे लेखन अनघा काकडे यांचे होते. तिन्ही संतांच्या जीवनकार्याची कथा अभंगाच्या पार्श्वभूमीवर नृत्याच्या पार्श्वभूमीवर उलगडत गेली.

नृत्य दिग्दर्शन अनघा हरकरे यांनी केले. स्मिता महाजन यांनी संगीत दिले. यात अनुश्री केतकर, श्रिया एकबोटे, प्रज्ञा कदम, बिलंदी कुलकर्णी, भार्गवी अत्रे, श्रद्धा पवळे आदींचा सहभाग होता. भारतीय विद्या भवन-इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६७ वा कार्यक्रम होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link