Next
मधु पंडित दासा यांना नॅशनल लिव्हिंग लिजंड पुरस्कार
प्रेस रिलीज
Thursday, November 22 | 03:46 PM
15 0 0
Share this story

आरोग्य, कायदा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री प्रताप जेना (उजवीकडे) यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना अक्षयपात्र फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंचलपथी दासा.भुवनेश्वर : अक्षय पात्र फाउंडेशनचे अध्यक्ष मधु पंडित दासा यांना आरोग्य, कायदा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री प्रताप जेना यांच्या हस्ते पहिला नॅशनल लिव्हिंग लिजंड पुरस्कार २०१८ प्रदान करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांमधील उपासमारी कमी करण्यासाठी फाउंडेशन करत असलेले कार्य आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या सामाजिक गरजांना परिणामकारक प्रतिसाद देणे यासाठी हा सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम भुवनेश्वर येथील द क्राउन हॉटेलमध्ये नुकताच प्रदान करण्यात आला. दासा यांच्या वतीने फाउंडेशनचे उपाध्यक्ष चंचलपथी दासा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी ओडीसा डायरी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रश्मीरंजन परीदा आणि लिव्हिंग लिजंड पुरस्कारांचे संयोजक देबाशिष समंतराय उपस्थित होते.

ओडीसाचे राष्ट्रीय पातळीवरील संबंध तसेच राज्य आणि देश अशा दोन्ही पातळीवरील प्रेरणादायी कामाचे कौतुक करण्यासाठी नॅशनल लिव्हिंग लिजंड पुरस्कारांची सुरुवात यावर्षीपासूनच करण्यात आली. ओडीसा डायरीचा उपक्रम असलेल्या ओडीसा लिव्हिंग लिजंड्स पुरस्कारांच्या रूपाने, अतुलनीय आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या ओडीसातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. जगातील सर्वोत्कृष्ट असलेले ओडीसामध्ये आणणे आणि ओडीसातील सर्वोत्कृष्ट ते भारत आणि जगापर्यंत पोहोचवणे यावर या पुरस्कारांमध्ये भर दिला गेला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link