Next
‘एफबीबी’ची पोलो टी-शर्ट्सची नवीन श्रेणी
प्रेस रिलीज
Saturday, April 28 | 12:46 PM
15 0 0
Share this story



नवी दिल्ली :
फ्युचर ग्रुपचे फॅशन डेस्टिनेशन समजल्या जाणाऱ्या ‘एफबीबी’ने पुरुषांसाठी भारतातील सर्वोत्तम कॉटनपासून बनवलेल्या नवीन पोलो टी-शर्ट्सची श्रेणी आणली आहे. नवीन श्रेणीचे अनावरण सध्याच्या उन्हाळ्याच्या असह्य उकाडा होत असताना अत्यंत योग्य वेळी होत आहे. कॉटनपासून बनवलेले हे टी-शर्ट्स स्पर्शात अत्यंत मुलायम आणि सध्याच्या असह्य उन्हाळ्यासाठी एकदम योग्य आहेत.

‘एफबीबी’चे नवीन पोलो कलेक्शन डीजे अँड सी, बफेलो, उम्ब्रो स्पंक, ली कूपर्स आणि चँपियन अशा ब्रँड्समध्ये उपलब्ध असेल. पुरुषांसाठीच्या नवीन पोलो टी-शर्ट्स कलेक्शनमध्ये सॉलिड, प्रिंटेड, स्ट्रीपर, ब्लॉक आणि फॅशन पोलोज यांची विविधता आहे. ३९९ रुपयांच्या किंमतीपासून सुरू होणारी ही श्रेणी फॅशनप्रेमींसाठी फायद्याची आहे. नवीन टी-शर्ट्स कलेक्शन स्टायलिश आणि ट्रेंडी असून, यातील कॉटन फॅब्रिक उन्हाळ्यासाठी एकदम उत्तम आहे.

‘एफबीबी’चे सीओओ राजेश सेठ म्हणाले, ‘नवीन पोलो टी-शर्टस कलेक्शन ग्राहकांसाठी आरामदायकता आणि सोय हे लक्षात ठेवून तयार करण्यात आहे. भारतीय कॉटनपासून बनवण्यात आलेले टी-शर्ट्स ग्राहकांना सर्वोच्च दर्जाचा आरामदायकता मिळेल.’

‘एफबीबी’चे नवीन कलेक्शन नेवी, ब्लू, मस्टरर्ड, लाल आणि काळ्या रंगात उपलब्ध असेल. असे विविध रंग आणि डिझाईन्स एकाच कलेक्शनमध्ये उपलब्ध असणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link