Next
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार रणवीर?
दिग्दर्शनाची धूरा सांभाळणार मेघना गुलजार; रणवीर सिंगला भूमिकेसाठी विचारणा
BOI
Wednesday, April 03, 2019 | 05:38 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी १९७१मधील बांग्लादेशच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून दिला होता आणि त्यांच्या या कामगिरीचा गौरव त्यांना ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन करण्यात आला होता. दिग्दर्शिका मेघना गुलजार या माणेकशॉ यांचा जीवनपट घेऊन येत आहेत. त्यात माणेकशॉ यांच्या भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंगला विचारण्यात आले असल्याचे गुलजार यांनी सांगितले आहे.

शत्रूपक्षाची ताकद आणि युद्धाची तयारी जोखून त्यानुसार आपले नियोजन करत यश मिळवणे, हे काम खरे सेनापतीचे असते. अशाच प्रकारचे सेनापती म्हणून सॅम माणेकशॉ यांनी आपली ही कामगिरी पार पाडली होती. ‘७१’च्या युद्धात भारतीय लष्कराचे नैतृत्व करणारे माणेकशॉ हे स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे पहिले ‘फिल्ड मार्शल’ ठरले. त्यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचे हे कर्तृत्व जगासमोर आणले जाणार आहे. अभिनेता रणवीर सिंगला या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. ‘राजी’फेम दिग्दर्शिका मेघना गुलजार या पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून एक लक्षवेधी कहानी सांगण्याची मोठी जबाबदारी पेलणार आहेत. 

‘फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्यासारख्या एका पराक्रमी सेना अधिकाऱ्याची कहानी दोन-अडीच तासांच्या एवढ्या कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, हे खरोखर एक आव्हान आहे. ही एका व्यक्तीवर आधारित असलेली कथा असल्यामुळे त्याचा संशोधनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. सध्या पटकथालेखनाचे काम सुरू आहे. माणेकशॉ यांना अधिकाधिक जाणून घेण्यासाठी मी माणेकशॉ यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही भेटले आहे. चित्रपटात काही भागांमध्ये १९७१चा काळ दाखवला गेला आहे’, अशी माहिती मेघना गुलजार यांनी सांगितली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search