Next
डॉ. भास्कर थोरात यांच्या आत्मकथनाचे २९ जुलैला प्रकाशन
प्रेस रिलीज
Friday, July 27, 2018 | 01:53 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक, थोर शास्त्रज्ञ आणि ‘बिल- मिलेंडा गेट’ या संशोधन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे सलग दोन वर्षे मानकरी ठरलेले डॉ. भास्कर थोरात यांच्या ‘हिरजची हिरकणी आणि चुंगीची पोरं’ या आत्मकथनाचे प्रकाशन २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता सोलापूर येथील निर्मिती लॉन्स येथे आयोजित करण्यात आले आहे.

‘ग्रंथाली’ प्रकाशित आणि डॉ. लतिका भानुशाली यांनी शब्दांकन केलेल्या या आत्मकथनाचे प्रकाशन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या होईल. या प्रसंगी शिवा गुरुजी सलवदे आणि सरोजिनी आडके यांचा विशेष सत्कार करण्यात येईल; तसेच डॉ. थोरात यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारी त्यांची आई सत्यभामा थोरात यांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

डॉ. थोरात यांचा जीवनप्रवास हा संशोधन क्षेत्रात झेप घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड प्रेरणादायी आहे. सोलापूरमधील छोटेसे गाव ‘हिरज’ ते मुंबईतील ‘यूडीसीटी’चे विभागप्रमुख हा त्यांचा प्रवास म्हणजे आंबेडकरी विचारधारांचा विजय आहे. समाजाच्या सर्वोच्च सोपनापर्यंत पोचण्याची सामान्य माणसाची धडपड, त्याच्या संघर्षाचा अत्यंत ओघवत्या व सहज शैलीत मांडलेला आलेख म्हणजे डॉ. थोरात यांचे आत्मकथन होय. डॉ. थोरात यांनी रसायनशास्त्रातील संशोधनाचा मापदंड प्रस्थापित करून त्याला सामाजिकतेचे भान दिलेले आहे. ‘ग्रामीण भारताच्या विकासाला या संशोधनाचा कसा हातभार लागू शकतो’ हा विचार केंद्रस्थानी ठेवूनच ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व, वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब या पुस्तकात उमटले आहे.

डॉ. भास्कर थोरातही केवळ एका शास्त्रज्ञाच्या जीवनाची गाथा नाही, तर विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधन आणि सामाजिकता यांचा समन्वय कसा घडवून अंत येईल, याविषयी एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञाने व्यक्त केलेले चिंतन आहे. एक खंबीर, सजग, कर्तव्यदक्ष स्त्री प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपल्या मुलांना शिक्षणासाठी कशी प्रेरित करू शकते याचे जिवंत उदाहरण डॉ. थोरात यांच्या आईच्या रूपात या आत्मकथनात अधोरेखित होते.

कार्यक्रमस्थळी १५० रुपयांचे पुस्तक सवलतीत १०० रुपयांत उपलब्ध असेल. ‘ग्रंथाली’ची अन्य पुस्तके नेहमीच्या सवलतीत उपलब्ध असतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असे, असे ‘ग्रंथाली’च्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी सांगितले.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : रविवार, २९ जुलै २०१८
वेळ : सकाळी ९.३० वाजता
स्थळ : निर्मिती लॉन्स, ८८, विजापूर रोड, नडगिरी पेट्रोल पंपासमोर, सोलापूर.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search