Next
‘सिंहगड’मध्ये ‘एनएसएस’द्वारे लोकजागर
प्रेस रिलीज
Friday, February 22, 2019 | 01:12 PM
15 0 0
Share this article:कुसगाव : लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत (एनसीसी) लोकजागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पुण्यातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, भारती विद्यापीठातील प्राध्यापक आणि रेखाचित्रकार गिरीश चरवड या प्रमुख पाहुण्यांसह प्राचार्य डॉ. एस. बी. देसाई, डॉ. जयवंत देसाई, श्री. वसेकर उपस्थित होते.

या वेळी बर्गे यांनी विद्यार्थ्यांना दहशतवाद, महिला सुरक्षितता कायदे यांबरोबरच स्पर्धा परीक्षांबद्दल सविस्तर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. या वेळी त्यांनी पोलीस खात्यातील सेवेचे अनुभव कथन करून शूटआउट लोखंडवाला, २६/११ बॉम्बस्फोटा यांसारख्या घटनांमधील पोलिसांच्या योगदानाविषयी माहिती दिली.प्रा. चरवड यांनी कलेचा सामाजिक क्षेत्रात उपयोग कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी त्यांच्या पोलीस खात्यातील योगदानाबद्दल सांगितले. १९९३पासून दहशतवादी, गुन्हेगारांची रेखाटलेली चित्रे, यातून पकडले गेलेले आरोपी यांविषयी माहिती देताना अशा वेळी कोणती सुरक्षितता घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याबरोबरच कविता, सरोद, वादन व नक्षीकाम यांचा उपयोग व कला यांविषयीही माहिती दिली.या वेळी ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांनी ‘वीर जवान तुझे सलाम’, ‘अन्ननासाडी व बेरोजगारी’ या सामाजिक विषयांवर नाटिका व नृत्य सादर करत त्यातून समाजोपयोगी संदेश दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, स्थावर व मालमत्ता अधिकारी पंकज जाधव व ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी सुमित देवर्षी आणि स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jayawant Desai About 208 Days ago
It was great opportunity for students to interact with Real Hero who has more than 400 encounters to his credit. He expressed his sorrow for not having opportunity to participate in the police action at 26/11 bomb blast as well he lost his friend "Shahid" Hon. Vijay Salaskar
0
0

Select Language
Share Link
 
Search