Next
‘युवकांच्या ताकदीवरच ‘राष्ट्रवादी’ महाराष्ट्रात मोठा ठरेल’
प्रेस रिलीज
Friday, May 11 | 11:47 AM
15 0 0
Share this story

युवक आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

मुंबई : ‘महाराष्ट्रातील युवकांची ताकद उभी राहिली, तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील सगळयात मोठा पक्ष म्हणून होवू शकतो. त्यामुळे मेहनत घ्या. पक्ष सत्तेवर येईल,’ असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युवकांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

राज्याच्या युवक प्रदेशची आढावा बैठक मुंबईच्या पक्ष कार्यालयात नुकतीच पार पडली. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘जो पक्षाचे काम करणार नाही त्याने आत्ताच सांगा कोण कुणासाठी थांबणार नाही. येत्या दोन महिन्यात म्हणजेच १० जुलैपर्यंत ९१ हजार ४०० बुथ तयार करा आणि संघटना मजबुत करा,’ असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.  

या बुथ कमिट्यांमध्ये किंवा जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या कमिटीमध्ये सर्वसमाजाच्या युवकांना आणि लोकांना समाविष्ट करून घेण्याबाबतही सांगतानाच येत्या काळात युवकांची भक्कम फळी बांधतानाच विभाग, जिल्हा, तालुकापातळीवर युवकांची शिबिरे घेणार असल्याची माहितीही पाटील यांनी या वेळी दिली. या बैठकीमध्ये अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत त्यांनी युवकांना मार्गदर्शन  केले.

या बैठकीमध्ये युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील यांनी युवक संघटनेच्या कामाबाबत माहिती दिली. या वेळी अनेक युवक जिल्हाध्यक्षांनी संघटना वाढीसाठी काय करायला, हवे याबाबतची माहिती दिली.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष पाटील आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील यांच्यासह प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, पक्षाचे खजिनदार आमदार हेमंत टकले, प्रदेशचे नेते अविनाश आदिक, युवक प्रदेश उपाध्यक्ष रविकांत वरपे, युवक प्रदेश सरचिटणीस अभिषेक बोके, प्रवक्ते महेश तपासे, युवकचे प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण आदींसह राज्यातील युवकचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link