Next
‘दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा लढणार’
प्रेस रिलीज
Wednesday, August 01 | 05:23 PM
15 0 0
Share this story

मुंबई : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. याबाबत बांद्रा पूर्व येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या लोकसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी नुकताच घेतला; तसेच या मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्त्यांना कामाला सुरुवात करण्यात आदेश त्यांनी दिले आहेत.

रिपब्लिकन पक्षाच्या ६१ व्या स्थापना दिनानिमित तीन ऑक्टोबर रोजी ठाण्यात भव्य महामेळावा आयोजित करून ‘आरपीआय’चे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी आठवलेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली होती. त्यात ‘आरपीआय’चे मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  

आठवले सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यापूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link