Next
‘रत्नागिरी इंग्लिश टीचर्स असोसिएशन’ची स्थापना
BOI
Monday, August 20, 2018 | 02:05 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरी शहर आणि परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील इंग्रजीच्या सर्व शिक्षकांना शैक्षणिक बाबींचे परस्पर आदान-प्रदान करून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी साह्य व्हावे, यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे ‘रत्नागिरी इंग्लिश टीचर्स असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली आहे. विभागाने नुकत्याच आयोजित केलेल्या क्षमता विकास कार्यशाळेमध्ये या उपक्रमाची घोषणा करण्यात आली.

प्रत्येक शिक्षक नवीन उपक्रम, नव्या अध्यापन पद्धती, मूल्यमापनाची विविध तंत्रे शोधत असतो. तसेच इंग्रजी ही वैश्विक ज्ञानभाषा असल्याने इंटरनेटवर भरपूर शैक्षणिक माहिती उपलब्ध आहे. अशा सर्व शिक्षकांना एकत्र आणून शैक्षणिक कार्य उंचावणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. कार्यशाळेला उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करून सदस्यत्व स्वीकारले आहे. विविध कार्यशाळा, स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन, अध्यापनातील विविध साहित्य वा प्रयोगांच्या माहितीचे व्हॉट्सअॅप, फेसबुक, ब्लॉग अशा माध्यमातून नियमितपणे आदान-प्रदान करण्याचा या असोसिएशनचा मानस आहे. 

याकरिता रत्नागिरी शहर आणि परिसरातील इंग्रजीच्या शिक्षकांनी स्वतःची नोंदणी करून इंग्रजी विभागाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. अतुल पित्रे यांनी केले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

नोंदणीसाठी :
व्हॉट्सअॅप : ८०८७१ १८०१७ 
ई-मेल : gjcreta@gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kate Vasant Baburao About 333 Days ago
Thanks, I am very happy. All English teachers need for come together
0
0
Patil Ekanath Shamrao About 333 Days ago
I think English Teacher Association is very necessary for all English teachers .Thank you very much
0
0
Rajendra vithoba shinde About 333 Days ago
Thanks . I am very happy.Today need of english speaking.
0
0
Pawar Premdas Gangaram About 333 Days ago
Nice. Effort
0
0

Select Language
Share Link
 
Search