Next
‘केसीएमई’ शिष्यवृत्तीसाठी ८२ उमेदवारांची निवड
प्रेस रिलीज
Friday, July 20, 2018 | 03:48 PM
15 0 0
Share this article:

पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अब्रॉडसाठी के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप्ससाठी अर्जदरांची मुलाखत घेताना निवड समिती.

मुंबई : के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने (केसीएमईटी) के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप्स फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अब्रॉडसाठी आलेल्या एक हजार ६६ अर्जांपैकी ८२ उमेदवारांना शिष्यवृत्ती दिल्याचे जाहीर केले. भारतातील सर्वोत्तम व गुणवान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्याच्या हेतूने दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीधारकांच्या संख्येत या वर्षी 45 टक्के वाढ झाली असून, एकूण शिष्यवृत्त्यांचे मूल्य २.९२ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

निवडण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये, आयआयटीमधून ग्रॅज्युएट झालेले २३ विद्यार्थी आहेत व उर्वरित विद्यार्थी बिट्स पिलानी, एसआरसीसी, नॅशनल लॉ स्कूल्स, सिम्बायोसिस, सेंट झेविअर्स, सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर व एनआयडी अशा अन्य नामवंत शैक्षणिक संस्थांमधले आहेत. उमेदवारांनी परदेशातील सर्वोधिक क्रमवारीच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतले आहेत. हार्वर्ड स्टॅनफर्ड, कोलंबिया, कार्नेज मेलन, यूसी बार्कले, पेनसिल्व्हानिया, ऑक्सफर्ड, एलएसई व केम्ब्रिज. विद्यार्थी कम्प्युटर सायन्स, इंजिनीअरिंग, एमबीए, लॉ, पब्लिक पॉलिसी व अर्थशास्त्र अशा विषयांत पोस्ट-ग्रॅज्युएशन करत आहेत.

दोन दिवस मुलाखती घेतल्यानंतर, के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष व महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे चेअरमन इमेरिटस केशुब महिंद्रा म्हणाले, ‘सकारात्मक बदल करण्यासाठी शिक्षण हे सर्वोत्तम शस्त्र असते आणि त्यासाठी दरवर्षी देशातील सर्वोत्तम व गुणवान विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो. विद्यार्थी स्वतःचा ठसा निर्माण करतील आणि देशाचे ऋण फेडून उज्ज्वल भवितव्यासाठी योगदान देतील, याची खात्री आहे.’

निवड समितीमध्ये विविध मान्यवरांचा समावेश होता. महिंद्रा अँड महिंद्रा लि. चेअरमन इमेरिटसचे केशुब महिंद्रा, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, महिंद्रा इंटरट्रेड लि.चे अध्यक्ष भारत दोशी, समूह अध्यक्ष ग्रुप सीटीओ व समूह कार्यकारी मंडळाचे सदस्य उल्हास यारगॉप, इंडियन स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंट्रप्रिन्युअरशिपचे (आयएसएमई) संस्थापक डीन व इंडियन स्कूल ऑफ डिझाइन अँड इनोव्हेशनचे अध्यक्ष डॉ. इंदू शहानी, ग्लोबल स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट कन्सल्टंट अँड चेंज मॅनेजमेंट एक्स्पर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सल्लागार रंजन पंत आणि महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांचे ईए ऐश्वर्या रामकृष्णन या समितीने निवडलेल्या उमेदवारांच्या दोन दिवस मुलाखती घेतल्या आणि मुलाखती दिलेल्या सर्व ८२ उमेदवारांना के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप्स फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अब्रॉड देण्याची शिफारस करण्यात आली.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, ‘शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी आम्हाला मिळणाऱ्या अर्जांच्या संख्येमध्ये व गुणवत्तेमध्ये सातत्याने वाढ होत आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. प्रत्येक अर्जाचे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे आणि ते खरेच प्रेरणादायी आहे. प्रगती करण्यासाठी उमेदवार या संधीचा योग्य उपयोग करतील आणि वैविध्यपूर्ण व महत्त्वपूर्ण मार्गांनी भारताला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे.’

संस्थापक के. सी. महिंद्रा यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टने सुरू केलेली ही पहिली शिष्यवृत्ती आहे आणि गुणवान भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील नामवंत विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी यामुळे संधी दिली जात आहे.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search