Next
‘एमडीएई’तर्फे डाटा सायन्समध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू
प्रेस रिलीज
Monday, May 27, 2019 | 11:30 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्स (एमडीएई) या पदव्युत्तर अर्थशास्त्र शिक्षणासाठी असलेल्या संस्थेतर्फे डाटा सायन्समध्ये नवीन पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून, यात वित्त, संगणक विज्ञान, सांख्यिकी आणि गणितासह इतर बऱ्याच विषयांचा समावेश आहे. हे विषय पर्यायी स्वरूपात निवडता येणार आहेत.

सांख्यिकी, गणिताच्या अनुभवासह बीएससी-आयटीमध्ये पदवीधारक असलेले आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. जागतिक स्तरावरील अग्रणी रिसर्च आणि आणि अॅनालिटिक्स सर्व्हिस कंपनी डेसिमल पॉइंट अॅनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहयोगाने संस्था हा अभ्यासक्रम सुरू करणार आहे.

अभ्यासक्रमाच्या शुभारंभाविषयी बोलताना ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि ‘एमडीएई’चे अध्यक्ष मेघनाद देसाई म्हणाले, ‘विद्यार्थ्यांकडून या विषयात एक विशेष, उद्योगाशी सुसंगत अभ्यासक्रमाची मागणी वाढल्याने डाटा सायन्स अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. कंपन्या त्यांचे विद्यमान कार्य ऑटोमॅटिक आणि डाटा-केंद्रित करण्यासाठी वेगाने विकसित करीत आहे, ज्यामुळे जागतिक पातळीवर डाटा वैज्ञानिक आणि डाटा-प्रशिक्षित व्यावसायिक कंपन्यांसाठी मौल्यवान संपत्ती ठरलेले आहे. इतर संस्थांद्वारे स्वीकारल्या जाणाऱ्या साधारण दृष्टीकोनाऐवजी ‘एमडीएई’च्या पीजीसी अभ्यासक्रम या क्षेत्राची सर्वसमावेशक आणि व्यावहारिक समज विकसित करण्यास मदत करेल. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि इंटर्नशिपच्यासंधी उपलब्ध करून दिल्या जातील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search