Next
सुरेश रामाणे यांना आदर्श दिग्दर्शक पुरस्कार जाहीर
कामगार नेते अभिजीत राणेंच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण
BOI
Saturday, April 27, 2019 | 04:18 PM
15 0 0
Share this article:

गुहागर : तालुक्यातील पाचेरी आगर रामाणे वाडी येथील सुरेश मालु रामाणे यांना विक्रोळीतील (मुंबई) अखिल भारतीय समाज कल्याण समिती या संघटनेतर्फे आदर्श दिग्दर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण एक मे २०१९ रोजी केले जाणार आहे.

या वेळी कामगार नेते तसेच वृत्तमित्रचे समूह संपादक अभिजीत राणे, नवी मुंबईच्या उपमहापौर चारुशिला घरत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रामाणे यांनी नाट्यसृष्टीमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. सुरुवातीला नमन, नाटक यांमध्ये फक्त कलाकाराची भूमिका करणाऱ्या रामाणे यांनी रंगभूमीच्या प्रत्यक्ष अनुभवानंतर दिग्दर्शक, नाटककार यांसारख्या भूमिका चोख बजावल्या. आजही नाट्यसृष्टीमध्ये काम करण्याची त्यांची ओढ आणि तळमळ कायम आहे. त्यांच्या आजवरच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search