Next
सदानंद रेगे, परशुराम वैद्य
BOI
Thursday, June 21, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

‘माझ्या अक्षरवेलीचे मन चांदण्यावरती, तिला लाटा सागराच्या खुणावती...बोलावती... ’ म्हणणारे कवी सदानंद रेगे आणि जुनेजाणते भाषाकोविद परशुराम वैद्य यांचा २१ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...
सदानंद शांताराम रेगे 

२१ जून १९२३ रोजी राजापूरमध्ये जन्मलेले सदानंद रेगे हे अनन्यसाधारण कवी, नाटककार, अनुवादक आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कवितांमधून सखोल आशय, वास्तव आणि अद्भुताची सरमिसळ असं एक आगळं सौंदर्यविश्व दिसून येतं. रुईया कॉलेजमध्ये ते मराठीचे प्राध्यापक होते. 

अक्षरवेल, गंधर्व, मीडिया, पाच दिवस, वेड्या कविता, जीवनाची वस्त्रे, मासा आणि इतर विलक्षण कथा, राजा इडीपस, बादशहा, गोची, पँट घातलेला ढग, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. मुंबईत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातल्या कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

२१ सप्टेंबर १९८२ रोजी त्यांचं निधन झालं.

(सदानंद रेगे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
............

परशुराम लक्ष्मण वैद्य 

२१ जून १९११ रोजी जन्मलेले परशुराम लक्ष्मण वैद्य हे भाषाकोविद म्हणून ओळखले जातात. त्यांना संस्कृत, पाली, अर्धमागधी, प्राकृत आदी भाषा अवगत होत्या. 

बौद्ध धर्माचा अभ्युदय व प्रसार, जैन धर्म वाङ्मय, अष्टांगहृदय, माधवनिदान, योगरत्नाकर असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचं संपादन केलं होतं. 

२७ फेब्रुवारी १९७८ रोजी त्यांचं निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search