मुंबई : महाराष्ट्रीयन प्रवाशांना सेवा देण्यासाठी, आपल्या विशेष प्रोजेक्ट टीमने केलेल्या सखोल बाजार व ग्राहक संशोधनाच्या मदतीने थॉमस कूक इंडियाने महाराष्ट्रासाठी विशेष रिजनल टूर्स घोषित केल्या आहेत. अविस्मरणीय युरोप व प्रेक्षणीय युरोप या टूर्समध्ये युरोपातील ठिकाणांचा समावेश आहे. या प्रमुख मराठी युरोप टूर्स वार्षिक ३० ते ४० टक्के दराने वाढत आहेत.
‘थॉमस कूक’साठी महाराष्ट्र ही महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि २०१८-१९साठी कंपनीने आखलेल्या व ३९ कन्झ्युमर अॅक्सेस सेंटर्स मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर व सोलापूर अशा महाराष्ट्रातील नऊ ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या १६ शाखा व २३ गोल्ड सर्कल पार्टनर फ्रेंचाइजी आउटलेट यांचा समावेश असलेल्या नियोजनामध्ये तिचे योगदान मोठे आहे. भारतातील थॉमस कूकच्या सध्याच्या लिजर व्यवसायात महाराष्ट्राचे योगदान ३५ टक्के आहे व वार्षिक २७ टक्के इतकी वाढ होण्याची अपेक्षा आहे. बहुतांश व्यवसाय मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथून निर्माण होत असून तेथे ‘थॉमस कूक’साठी मागणी वाढली आहे.
‘थॉमस कूक’च्या हॉलिडेज, माइस, व्हिसा व पासपोर्ट सेवाचे प्रेसिडेंट व कंट्री हेड राजीव काळे म्हणाले, ‘थॉमस कूकच्या आउटबाउंड व्यवसायामध्ये महाराष्ट्राचे योगदान ३५ टक्के आहे आणि प्रचंड वाढ व उच्च क्षमता विचारात घेता, कंपनीने महाराष्ट्रावर विशेष भर देण्याचे ठरवले आहे. एकनिष्ठ व महाराष्ट्रीयन ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्ही खास रिजनल टूर पॅकेज जाहीर केली आहेत. ही पॅकेज आंतरराष्ट्रीय हॉलिडेमध्ये असताना प्रादेशिक अनुभव देतात आणि त्यासाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, बुकिंगमध्ये वार्षिक ३० ते ४० टक्के वाढ होत आहे.’