Next
‘माउंटन रन’मध्ये साडेचारशेहून अधिक डोंगरप्रेमींचा सहभाग
‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’च्या औचित्याने ‘गिरिप्रेमी’चा उपक्रम
BOI
Tuesday, December 11, 2018 | 05:48 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’चे औचित्य साधून ‘गिरिप्रेमी’ने रविवारी, ९ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या ‘माउंटन फेस्टिव्हल’मधील ‘माउंटन रन’ व ‘वॉकेथॉन’ला डोंगरप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. वेताळ टेकडीवर झालेल्या या स्पर्धांमध्ये ४५० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. 

‘गिरिप्रेमी’ने आयोजित केलेल्या या ‘माउंटन रन’ची दखल संयुक्त राष्ट्रसंघानेदेखील घेतली असून, त्यांच्या ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’च्या उपक्रमाशी ही स्पर्धा संलग्न आहे. यामुळे ‘डोंगर वाचवा- डोंगर जगवा’ या संकल्पनेला मोठे पाठबळ मिळाले व डोंगरांविषयी अधिकाधिक जनजागृती होण्यास मदत मिळाली. पुण्यासह मुंबई, जळगाव, नागपूर येथून आलेले डोंगरप्रेमी यात सहभागी झाले होते. 
 
प्रो गट (१० किलोमीटर), अमेच्युअर गट (१० किलोमीटर), लहान मुले (पाच किलोमीटर), वॉकेथॉन (पाच किलोमीटर) अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातून तीन पुरुष व तीन महिला विजेते निवडण्यात आले.

रविवारी, सकाळी सहा वाजता कामायनी मुनोत हॉल, गोखले नगर येथे ‘माउंटन रन’ला ‘यशदा रियल्टी’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष वसंत काटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. चारही गटातील स्पर्धकांनी अतिशय उत्साहात वेताळ टेकडीवरील पायवाटेवरून धावत ही स्पर्धा पूर्ण केली.

स्पर्धेनंतर लगेचच झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात वसंत काटे, उद्योजक रोहिदास गवारे, वन विभागाच्या अधिकारी श्रीलक्ष्मी अन्नाबठूला, विखे पाटील मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका मृणालिनी भोसले व ‘गिरिप्रेमी’चे विश्वस्त आनंद पाळंदे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. 

१० किलोमीटर प्रो विभागात महिला गटात यमुना लडकत, दीपा नाडगीर यांनी अनुक्रमे प्रथम व दिवितीय क्रमांक मिळवला. पुरुष गटात भागिनाथ गायकवाड, किशोर जाधव व आकाश परदेशी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. १० किलोमीटर अमॅच्युअर विभागात महिलांमध्ये ज्योती ओटागेरी यांनी प्रथम क्रमांक, वर्षा गांधी यांनी द्वितीय तर सविता पाचपांडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. पुरुष गटात सिद्धेश अंबेकर, सर्वेश अंबेकर व शंतनु देव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. पाच किलोमीटरच्या स्पर्धेत बालगटात मुलींमध्ये प्रणवी बिऱ्हाडे हिने प्रथम, मृणाल ठकारने द्वितीय तर श्रेया भदे  हिने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांच्या गटात  ईशान जैन प्रथम, ओमकार ओक द्वितीय आणि निहार शाह याने तृतीय क्रमांक पटकावला.  

या वेळी गिरिप्रेमीचे प्रमुख उमेश झिरपे म्हणाले,‘अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्याचे आमचे हे दुसरे वर्ष आहे. डोंगर आणि त्यावरील निसर्गसंपदा जपण्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्यासाठी युनेस्कोने ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. ७० टक्के पाणी हे डोंगरामधून येते. त्यामुळे डोंगर वाचवणे महत्त्वाचे आहे. यंदाच्या पर्वत दिनाची मुख्य संकल्पना ‘डोंगर वाचवा’ अशी आहे. त्यामुळे आम्ही या वेताळ टेकडीवर ‘माउंटन रन’चे आयोजन केले. युनेस्कोतर्फे जगभरात हा उपक्रम राबवला जात आहे.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link