Next
‘अॅटलास कॉप्को’तर्फे भारतात जागतिक बैठक
प्रेस रिलीज
Friday, September 14, 2018 | 12:52 PM
15 0 0
Share this story

पुणे : सस्टेनेबल प्रॉडक्टिव्हिटी सोल्यूशन्स (शाश्वत उत्पादनक्षम सुविधा) क्षेत्रातील आघाडीची पुरवठादार असलेल्या अॅटलास कॉप्को कंपनीतर्फे जागतिक भेटीचा एक भाग म्हणून भारतात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत कंपनीने सरकारच्या ‘मेक इन इंडिया’शी सुसंगत कामाचे स्वरूप मांडले जाणार आहे. कंपनीसाठी भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आणि कंपनीने सातत्याने भारतात विकास साधला असून गुंतवणूकही केली आहे.

ही कंपनी गेल्या जवळपास ६० वर्षांपासून भारतात उत्पादन करत आहे. अॅटलास कॉप्को भारत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये आपले वैशिष्ट्यपूर्ण कॉम्प्रेसर्स, व्हॅक्यूम उत्पादने, जनरेटर्स, पंप्स, पॉवर टुल्स आणि जुळणी यंत्रणा पुरवते. अॅटलॉस कॉप्कोच्या कार्यकारी समितीने (ईसीएम) ही बैठक आयोजित केली आहे.

२०१३मध्ये कंपनीने चाकण येथे औद्योगिक व पोर्टेबल कॉम्प्रेसर्सचे उत्पादन करण्यासाठी अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक कारखाना उभारला असून, १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. हा कारखाना आयजीबीसीतर्फे (इंडियन ग्रीन बिल्डिंग गोल्ड कौन्सिल) एलईईडी सर्वोत्तम पद्धतींनुसार (लीडरशीर इन एन्व्हॉरमेंटल एनर्जी अँड डिझाइन) प्रमाणित करण्यात आला आहे. त्याशिवाय या कारखान्याला २०१६पासून ऊर्जा व्यवस्थापनासाठी आयएसओ ५०००१ प्रमाणपत्र देण्यात आले आहे; तसेच आयएसओ १४००१, ओएचएसएएस १८००१, आयएसओ ९००१ असे तिहेरी प्रमाणपत्रही मिळालेले आहे.

चाकण येथील अॅटलास कॉप्को उत्पादन कंपनी लीन उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असून, यावर्षाच्या सुरुवातीला छतावर बसवण्यात आलेल्या सोलर सेल्सप्रमाणे सातत्याने सुधारणा करत असते. हा कारखाना वीजेबाबत स्वयंपूर्ण असून, येथे होणाऱ्या विजेच्या वापरात रिन्यूएबल ऊर्जेचे प्रमाण ८० टक्के आहे. कारखान्याद्वारे आता वार्षिक पातळीवर ६०० टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन थांबवले जाणार आहे.

संशोधनाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कॉप्कोने आपले इंडस्ट्री ४.० व्हिजन साकार करण्यासाठी भारतात नुकतेच स्मार्ट कनेक्टेड असेंबली सोल्यूशन्स सादर केले. कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक उत्पादनांच्या मोठ्या श्रेणीचे उत्पादन करते. ही उत्पादने लवचिक उत्पादनक्षमता, उच्च दर्जा आणि सुरक्षा मापदंड, कार्यक्षमता असा वैशिष्ट्यांनी युक्त आहेत.

२००२मध्ये अॅटलास कॉप्कोने पुण्यात आरअँडडी केंद्र ग्लोबल इंजिनीअरिंग सेंटर इंडिया एयरपॉवर (जीईसीआयए) सुरू केले व आज त्यामध्ये ६५० प्रशिक्षित इंजिनीअर्स कार्यरत आहेत. हे सर्व इंजिनीअर्स सॉफ्टवेअर टुल्स, उत्पादनाचे विस्तृत ज्ञान आणि आवश्यक त्या क्षमतांचे प्रशिक्षण घेतलेले आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅट्स राह्मस्टॉर्म यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्टॉकहोम येथे भेट घेऊन कंपनीच्या भारतातील योजनांवर चर्चा केली होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link