Next
‘‘लायन्स क्लब’मुळे पोलिसांना घरच्या जेवणाचा आस्वाद’
श्रीकांत तरवडे यांचे प्रतिपादन
BOI
Saturday, September 14, 2019 | 12:54 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘गणेश विसर्जन काळात अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सकस आहार उपलब्ध करून देण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लायन्स क्लबतर्फे उभारलेल्या या श्रमपरिहार केंद्रामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना घरच्यासारखे ताजे आणि पौष्टिक जेवण मिळाले. या भोजनव्यवस्थेमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना, सुरक्षारक्षकांना आणि पोलिस मित्रांना बंदोबस्त करताना कुठलीही अडचण भासत नाही,’ असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी केले. 

लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात आले होते. गेल्या १५ वर्षांपासून हे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात येते.  लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल अभय शास्त्री, माजी प्रांतपाल फत्तेचंद रांका, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष नितीन मेहता, सचिव अनिल सुगंधी, खजिनदार विक्रम ओसवाल, कल्पेश पटनी, प्रविण ओसवाल यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फत्तेचंद रांका म्हणाले, ‘गणेशोत्सव काळात गेल्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. पोलिस कर्मचारी, होमगार्ड्स, पोलिस मित्र आणि आणि रांगोळीच्या पायघडया घालणाऱ्या राष्ट्रीय कला अकादमीच्या तीनशे स्वयंसेवकांना पॅकेट्समधून ताजे व पौष्टिक जेवण दिले जाते. शिवाय केंद्रावर ८०० ते १००० लोक जेवण करतात. घरगुती पोळ्या, भाजी, पुलाव व गुलाबजाम आदी पदार्थ यामध्ये असतात.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search