Next
चित्रपदार्पण पुरस्कारांची नामांकने जाहीर
BOI
Tuesday, February 19, 2019 | 04:59 PM
15 0 0
Share this story

पुणे : नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी डिव्हाईन कॉज सोशल फाउंडेशन आणि मराठी चित्रपट परिवारातर्फे देण्यात येणाऱ्या चित्रपदार्पण पुरस्कारांसाठीची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. 

यामध्ये रेडू, चुंबक आणि हॉस्टेल डेज या चित्रपटांना सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत. रेडू, मंत्र, चिठ्ठी, चुंबक, अबक, फर्जंद, पुष्पक विमान या चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी स्पर्धा आहे. एक मार्च २०१९ रोजी एस. एम. जोशी सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

‘सागर वंजारी (रेडू), दिग्पाल लांजेकर (फर्जंद), हर्षवर्धन (मंत्र), राम शेडगे(अबक), संदिप मोदी (चुंबक), वैभव डांगे (चिठ्ठी), वैभव चिंचाळकर (पुष्पक विमान) यांच्यामधून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरणार आहे,’ अशी माहिती डिव्हाईन कॉज सोशल फाउंडेशनच्या प्रमुख प्रीती व्हिक्टर आणि सुनंदा काळुसकर यांनी दिली. 

‘सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागात शुभंकर एकबोटे (चिठ्ठी), सौरभ गोगटे (मंत्र), सुव्रत जोशी (शिकारी), अंकित मोहन (फर्जंद), साहिल जाधव (चुंबक) यांना नामांकने मिळाली आहेत, तर अभिनेत्रींमध्ये प्रणाली घोगरे (रणांगण), तृप्ती तोरडमल (सविता दामोदर परांजपे), नेहा खान (शिकारी), मालविका गायकवाड (मुळशी पॅटर्न ), गौरी किरण (पुष्पक विमान), धनश्री काडगांवकर (चिठ्ठी), गायत्री जाधव (बबन) यांच्यात चुरस आहे. नॉन फिल्मी म्युझिक अल्बम विभागामध्ये ‘यु अँड मी’, चल ऊसामंदी जाऊ, झिलमिल, तू नसताना रिमझिम रिमझिम, हलकेच निळा घन आला, साहिबा या गाण्यांना नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा, संवाद यांसह २२ विविध विभागांध्ये पुरस्कार देण्यात येणार आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link