Next
भारतीय उद्योजकांसाठी फेडेक्सद्वारे अनोखी स्पर्धा
प्रेस रिलीज
Monday, April 30, 2018 | 05:42 PM
15 0 0
Share this story

पुणे :  फेडेक्स एक्स्प्रेस कंपनीतर्फे पुन्हा एकदा ‘फेडेक्स स्मॉल बिझनेस ग्रॅन्ट कॉन्टेस्ट’ आयोजित करण्यात येत आहे. लघु आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) संधी मिळवून देण्यास मदत करणे हा या स्पर्धेचा हेतू आहे. २०१७ मधील पहिल्या यशस्वी पर्वानंतर याही वर्षी तळमळीने व्यवसाय करणाऱ्या आणि कल्पक एसएमईंना १५ लाख  रुपयांचे अनुदान जिंकण्याची संधी आहे.
 
एक वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या सर्व लघु व मध्यम उद्योगांसाठी ही स्पर्धा खुली आहे. एसएमईंना मदत आणि आर्थिक स्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. यामुळे त्यांना अधिक प्रगती करण्यास मदत होईल आणि स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाणे खणखणीत वाजवता येईल. या अनुदानामुळे विजेत्या उद्योजकांना त्यांची गुणवत्ता व क्षमता या क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर सादर करून आपले अस्तित्व व्यापक करता येईल आणि त्यांचा दर्जा उंचावता येईल.
 
याबाबत भारतातील फेडेक्स एक्स्प्रेसच्या ग्राउंड ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष फिलीप चेंग म्हणाले, ‘लघु उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि त्यांना प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून देताना आम्ही अत्यंत आनंदी झालो आहोत. सध्याच्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असलेली विविध प्रकारची डिजिटल साधने आणि माध्यमांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे आणि नवीन ग्राहक मिळवणे आणि आपल्या उद्योगाला वरच्या पातळीवर नेणे एसएमईंसाठी सुलभ झाले आहे. एसएमईंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.’

या स्पर्धेच्या पहिल्या वर्षी नाशिक येथील वरूण अॅग्रो प्रोसेसिंग फूड्स प्रा. लि. या स्थानिक शेतकऱ्यांसमवेत काम करणाऱ्या आणि उत्तम दर्जाचा फळांचा गर व टोमॅटोची पेस्ट निर्यात करणाऱ्या कंपनीची  देशभरातील विविध क्षेत्रांतील १८० अर्जांमधून निवड करण्यात आली. या संदर्भात वरूण अॅग्रोच्या संचालिका मनीषा धात्रक म्हणाल्या, ‘फेडेक्स स्मॉल बिझनेस ग्रॅन्ट जिंकणे हा अत्यंत विस्मयकारक अनुभव होता. त्यामुळे कंपनीला एक सकारात्मक चालना मिळाली आणि शेतकरी भागीदार, क्लाएंट्स व नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचणे तुलनेने सुलभ झाले.

स्पर्धक  fedex.com/grantcontest/in या संकेतस्थळावर ५ जून २०१८ पर्यंत आपल्या प्रवेशिका भरू शकतात. सर्व प्रवेशिकांची छाननी करून दहा प्रवेशिकांची निवड करण्यात येईल आणि त्यांना त्यांच्या व्यवसायाचे सादरीकरण करण्यास निमंत्रित करण्यात येईल. ऑगस्ट महिन्यात अंतिम विजेत्याचे नाव घोषित करण्यात येईल. प्रवेश प्रक्रिया, निवडीचे निकष आणि स्पर्धेचे औपचारिक नियम  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link