Next
‘टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन’ सुविधा दाखल
प्रेस रिलीज
Tuesday, March 27, 2018 | 04:38 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘टाटा स्काय’ या भारतातील आघाडीच्या सर्वसमावेशक व डीटीएच आणि ओटीटीद्वारे कंटेट वितरित करणाऱ्या कंपनीने आंतरराष्ट्रीय मनोरंजनातील क्षेत्रातील निवडक कंटेट दाखल  केला आहे.

या नव्या सेवेविषयी टाटा स्कायचे मुख्य कंटेट अधिकारी अरूण उन्नी म्हणाले, ‘टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन’चे दाखल करून आम्ही सिनेमा आणि टीव्हीप्रेमींना ६५० तासांचे मिळून उत्तम दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करत आहोत. त्यात केवळ हॉलिवूडच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील सर्वोत्तम गोष्टींचा जाहिरातींशिवाय आनंद घेता येणार आहे. आमचे विश्लेषण असे सांगते, मनोरंजनाचे प्रकारांची आवड बदलत आहे आणि प्रेक्षकांना आता जास्तीत जास्त उत्सुकतापूर्ण व वैविध्यपूर्ण आशय हवा असतो; तसेच त्यांना भाषेचा अडसर जाणवत नाही. आमच्या निवडक यादीत जगभरातील काही अतिशय लोकप्रिय आणि समीक्षकांनी गौरवलेले आणि आतापर्यंत भारतातील टीव्हीवर कधी न दर्शवलेले सिनेमे व टीव्ही शोजचा समावेश आहे.
 
टाटा स्कायने सुरू केलेल्या या आणखी एका अनोख्या उपक्रमाअंतर्गत पहिल्यांदाच एखाद्या डीटीएच व्यासपीठाद्वारे जाहिरात मुक्त सेवा दिली जाणार आहे, ज्यामध्ये नोंदणीदारांना २४x७ उपलब्ध असलेल्या, जगभरातील मालिका व सिनेमे पाहाता येतील. विशेष म्हणजे, यातील बहुतेक आशय यापूर्वी भारतातील टीव्हीवर दाखवण्यात आलेला नाही. हा आशय नोंदणीदारांना त्यांच्या टीव्ही सेटवर एसटीबी, टाटा स्काय मोबाइल अप आणि टाटा स्कायच्या वेब अपद्वारे (watch.tatasky.com) पाहाता येईल. कोणत्याही अतिरिक्त इंटरनेट जोडणीशिवाय टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन दरमहा केवळ ७५ रुपयांत नोंदणीदारांसाठी उपलब्ध होणार आहे. हा कंटेट मोठ्या पडद्यासोबतच मोबाइल किंवा लॅपटॉपवरही उपलब्ध होणार आहे.’ 
  
‘टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनमध्ये वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांतील आणि भाषांतील (अरेबिक, रशियन, स्पॅनिश, बेल्जियम, इस्त्राएल, क्युबा, जर्मन, फ्रेंच, इटालियन, पोर्तुगीज, हिंदी, जपानी, चीनी आणि कोरियन) प्रमुख मनोरंजनाचा समावेश असेल. इंग्रजीमध्ये नसलेल्या कंटेटसाठी उपशीर्षके देण्यात येतील, तर काहींचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले जाईल. सिनेमांमध्ये हॉलिवूडच्या काही आघाडीच्या स्टार्सचे सिनेमे, परिचित फ्रँचाईझी तसेच आंतरराष्ट्रीय भाषांतील निवडक भाषा, आशय आणि सिनेमॅटिक कौशल्यांसाठी प्रसिद्ध असलेले सिनेमे, अक्शनपट, कोरिओग्राफी आणि स्टंट्ससाठी प्रसिद्ध असलेले सिनेमे यांचा समावेश आहे. तर, ड्रामा सीरीजमध्ये समीक्षकांनी गौरवलेले ब्रिटिश, हिब्रू, स्पॅनिश, इटालियन आणि कॅनेडियन रहस्य, थ्रिलरपट तसेच नॉयरपट आणि काही आंतरराष्ट्रीय मालिकांचा समावेश आहे. टीव्ही सीरीज बॉक्स सेट्स प्रीमियर्समध्ये प्रसिद्ध थ्रिलर्स वॉलांडर, हॅपी व्हॅली, कोड ३७, टीम चॉकलेट, प्रिझनर्स ऑफ वॉर आणि बेबीलॉन बर्लिन यांचा समावेश आहे. दरमहा जागतिक सिनेक्षेत्रातील दोन प्रीमियर्सही पाहायला मिळतील.’ असेही उन्नी यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link