Next
रसिक मित्र मंडळच्या ‘ईद मिलन मुशायरा’ला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Wednesday, June 12, 2019 | 11:52 AM
15 0 0
Share this article:


पुणे : रमजान ईदीचे औचित्य साधून रसिक मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उर्दू, हिंदी, मराठी, गुजराती या भाषेतील ‘ईद मिलन मुशायरा’ कार्यक्रमाला रसिकांचा चांगला  प्रतिसाद मिळाला.

मुशायराचे आयोजन पत्रकार भवनच्या सभागृहात निमंत्रित कवींच्या उपस्थितीत १० जून रोजी करण्यात आले होते. या प्रसंगी एस. एस. राही, रहिमा पटेल, सीमा शर्मा, शायर इसामुद्दीन शोला, हेमंत सीमंत, हेमंत पुणेकर, हरिवल्लभ शर्मा, सुधीर कुबेर, शमसाद टाकेदार, मुमताझ पीरभॉय, रफिक काझी, नझीर फतेहपुरी, प्रदीप निफाडकर यांनी बहारदार रचना सादर केल्या.

सलीम चिश्ती, मुनवर पिरभॉय, मुमताझ पीरभॉय यांच्यासह अनेक मान्यवर रसिक या वेळी उपस्थित होते. सुरेशचंद्र सुरतवाला, रफीक काझी, प्रदीप निफाडकर यांनी या कार्य्क्रमचे आयोजन केले होते. यात उर्दू, हिंदी, मराठी, गुजराती अशा चार भाषातील १० कवींनी मुशायऱ्यात भाग घेतला. 


हेमंत पुणेकर यांनी सुरेश भटांच्या ‘मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे’ या गझलचा गुजराती अनुवाद सादर केला. शिवाय ‘स्वप्न में आवजाव राखे छे‘ असे आर्जवही गुजराती भाषेतून केले. 

डॉ. राहिमा पटेल यांनी जाती -धर्मभेदावर बोट ठेवले. ‘एक सा रंग है लहू का, फिर दिलो में ये भेद क्यू है? कही केसरिया, कही हरा क्यू है?,’ असा प्रश्न त्यांनी शायरीतून विचारला. तर सुधीर कुबेर यांनी ‘पायवाटा आडवाटा टाळल्या मी, सरळ रस्ते सारखे का वळत होते?,’ असे सुधीर कुबेर यांनी विचारले. निफाडकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरतवाला यांनी प्रास्ताविक केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sayyed Sairabano J Kazi About 72 Days ago
Suratwala ki Adabi muhim me sinhacha vata hai, Rafique Kazi sahab aur Nifadkar ji un ke kandhe se kandha mila kar chal rahe hain. Rasik Mitra Mandal Pune ko Bahut bahut Mubarakbad.
0
0
vasant n solanki About 72 Days ago
Sarvang sundar mushairache shrey suratwalaji & nifadkarji na jate. Rasik mitra mandal nehmi changlech ksryakam det rahte. Dhanyvad.
0
0

Select Language
Share Link
 
Search