Next
‘पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉन’चे १० मार्चला आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, March 05, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोपुणे : महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी जागृत करण्यासाठी फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टतर्फे १० मार्च २०१९ रोजी ‘पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनचे हे तिसरे वर्ष असून, ही मॅरेथॉन सकाळी ५.३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयापासून सुरू होणार आहे.

‘यंदाच्या पुणे वुमन्स हाफ मॅरेथॉनची मध्यवर्ती थीम ‘माय रीव्होल्यूशन’ ही असून, मॅरेथॉनला ‘आयएएएफ-एआयएमएस’ची मान्यता मिळाली आहे. केवळ महिलांसाठीच असलेल्या या मॅरेथॉनमध्ये स्पर्धक २१ किलोमीटर धावणार आहेत. त्याबरोबरच १० किमी आणि चार किमी धावण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातील,’ अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष कमांडर (निवृत्त) जितेंद्रन नायर यांनी दिली.

मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर जावेद पानसरे म्हणाले, ‘या मॅरेथॉनच्या निमित्ताने महिलांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे. त्यांनी कामाच्या धावपळीतून बाहेर पडून स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाला प्रेरित करतील आणि त्यांच्याही आयुष्यात सकारात्मक बदल घडेल.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link