Next
पुणे येथे आरोग्य दिंडीचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, July 10 | 10:52 AM
15 0 0
Share this story

पुणे : क्षय रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि या रोगाबाबत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्यातर्फे आरोग्य जनजागृती दिंडीचे आयोजन आठ जुलै रोजी करण्यात आले होते. या वेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या वारकऱ्यांना क्षय रोगाची लक्षणे, रोगनिदान, क्षय रोगाचा प्रसार, उपचार याबद्दल माहिती देणारे ‘क्षय रोगाला घालूया आळा’ हे पथनाट्य सादर करण्यात आले.

ससून रुग्णालयाच्या स्त्री व पुरुष परिचारिकांनी हे पथनाट्य बसविले होते. खोकला, रस्त्यावर कुठेही थुंकणे, वाईट सवयी, व्यसने व त्यांचे दुष्परिणाम आहाराकडे दुर्लक्ष, कुटुंबातील नातेसंबंध, श्रद्धा-अंधश्रद्धांचा परिणाम या सर्व बाबींची विनोदी कौटुंबिक नाटिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाने प्राध्यापक विभाग प्रमुख डॉ. संजय गायकवाड, वॉर्ड क्रमांक २७च्या इन्चार्ज सिस्टर गंधे व पुरुष परिचारिका व विद्यार्थी यांच्या समूहाने हा अनोखा उपक्रम कर्मचारी क्वार्टर्स ससून रुग्णालय व संत गाडगे महाराज धर्मशाळा येथे सादर केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link