Next
अशोक मानकरांनी केले जळीतग्रस्तांना भोजन पाकिटांचे वाटप
प्रेस रिलीज
Tuesday, December 04, 2018 | 02:12 PM
15 0 0
Share this story

पुणे : पाटील इस्टेटजवळ महात्मा गांधी वसाहत परिसरात लागलेल्या आगीत जळालेल्या ९० झोपड्यांतील रहिवाश्यांची खासदार अॅड. वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे (पश्चिम महाराष्ट्र) अध्यक्ष अशोक मानकर आणि सहकाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली. या प्रसंगी ५०० जळीतग्रस्तांना भोजन पाकिटांचे वाटप करण्यात आले.

मानकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी भोजन वाटप केले. या प्रसंगी नीलेश निकम, राजू साने, स्वप्नील दुधाणे, मिलिंद वालवलकर, आशा साने, मनाली भिलारे, अशोक राठी, बाळासाहेब बोडके, श्रीकांत पाटील, उर्मिला गायकवाड, संतोष चव्हाण, प्रमोद शिंदे, महेश हांडे, शुभम माताळे, ऋषिकेश कडू, विलास साळुंखे, आकाश म्होकर, श्रीकांत बालघरे, सतीश अंबुरे, प्रशांत गांधी, स्वप्नील खवले, आरती गांधी, संगीता मोहोळ, गौरी गायकवाड आदी उपस्थित होते.

या वेळी मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पीडित कुटुंबियांचे त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link