Next
‘फिनोलेक्स’तर्फे वारकऱ्यांना कापडी बॅग, हरिपाठाचे वाटप
प्रेस रिलीज
Saturday, July 07, 2018 | 04:34 PM
15 0 0
Share this article:

पुणे : गेली ३० वर्षे ‘फिनोलेक्स’तर्फे वारकऱ्यांची अखंडपणे सेवा केली जात आहे. दर वर्षी वारकऱ्यांना कापडी पिशव्या, लाडू आणि अल्पोपहार पूरविण्याबरोबरच तीन वर्षांपासून वैद्यकीय शिबिरांचे आयोजनही ‘फिनोलेक्स’तर्फे करण्यात येत आहे.

ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूच्या सहकार्याने बारामती आणि अकलूज येथे ही शिबिरे घेण्यात येणार आहेत. एक वैद्यकीय व्हॅन आणि रुग्णवाहिका, बीव्हीजी यांच्या सहकार्याने उपलब्ध करून दिली आहे. डॉक्टरांचा चमू वारकऱ्यांमधील ताप, डोकेदुखी, खोकला, अपचन, अशक्तपणा, अलर्जी, निर्जलीकरण, डोळे आणि कानांच्या समस्या आदी आजारांवर उपचार करणार आहेत; तसेच वारकऱ्यांना औषधे, गोळ्या, ग्लुकोज, बँडेज आणि प्रथमोपचार नि:शुल्क दिले जाणार आहेत.

मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, ‘पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी तसेच शहारातील परिसर प्लास्टिकमुक्त राहावा यासाठी, फिनोलेक्स पाइप्स वारकऱ्यांना कापडी पिशव्या आणि स्वतःच्या पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन येण्यास सांगत आहे, ज्यामुळे ते जात असलेला प्रत्येक भाग प्लास्टिकमुक परिसर असेल.’

अल्पोपहार आणि वैद्यकीय मदतीसोबतच फिनोलेक्स पाइप्स हरिपाठ (संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या २८ अभंगांची गाथा) असलेल्या एक लाख पिशव्यांचे वाटप निगडी, दिघी, दिवे घाट आणि उरळीकांचन येथे करणार आहे. वारी थांबणाऱ्या अनेक ठिकाणी अन्नवाटपाचा कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे. ‘फिनोलेक्स’ने निगडी, दिघी, उरळीकांचन, सासवड, निरा, बारामतती, बीड (गजानन महाराज पालखी, शेगाव) आणि इंदापूर येथे अन्नवाटपाचे स्टॉल्स उभारले आहेत.

फिनोलेक्स पाइप्सचे विक्री आणि पणन विभागाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी म्हणाले, ‘गेले ३० वर्षे ‘फिनोलेक्स’ला इतक्या प्रचंड जनसमुदायाची सेवा करण्याचे भाग्य लाभत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांशी आमचे एक विशेष नाते निर्माण झाले आहे. या शेतकऱ्यांपैकी अनेकजण या कार्यक्रमांत सहभागी होतात. समाजाला एकत्र आणण्यासाठी हा उत्सव एक उत्तम मार्ग आहे आणि वारीत सहभागी होऊन या समाजाला पाठिंबा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search