Next
क्लियरटॅक्स ई वे बिल सादर
प्रेस रिलीज
Thursday, March 01 | 01:40 PM
15 0 0
Share this story

मुंबई : व्यवसायाचे अनुपालन सोपे आणि सोयीस्कर बनविण्याचा आपला उद्देश अधोरेखित करत, ‘क्लियरटॅक्स’ या भारताच्या अग्रगण्य टॅक्स आणि अनुपालन मंचाने अलीकडेच ‘क्लियरटॅक्स ईवे बिल’ लाँच केले आहे. कोणत्याही इआरपी प्रणालीशी जुळवून घेणारे क्लियरटॅक्स ईवे बिल हे एक अत्यंत वेगवान सॉफ्टवेअर आहे, ज्याचा  उद्देश आहे व्यवसायांसाठी ईवे बिल अनुपालन अत्यंत सोपे करणे.

वापरकर्ते ईवे बिलाचे ऑटो-इनपुट भाग-बी आणि इन्व्हॉईसेस मोठ्या प्रमाणावर आपलोड करू शकतात. बिलाच्या भाग-बीचे अपडेशन झाल्यानंतर ईवे बिलची वैधता सुरू होते. हे सॉफ्टवेअर द्विरुक्ती टाळण्यासाठी स्वतःहून ईवे बिल माहितीची वैधता तपासते आणि मुदत अचूक असल्याची खात्री करण्यासाठी स्वतःहून अंतर मोजते. जर वैधता संपलेली असेल, तर केवळ एकाच क्लिकने ईवे बिल पुन्हा जनरेट करता येते किंवा त्याची वैधता वाढवता येते. काही चूक झाल्यास, हे सॉफ्टवेअर उपयोगकर्त्याला रियल-टाइममध्ये सूचना देते आणि बाकी असलेल्या, अवैध ई-बिलांच्या विश्लेषणाचे तपशील दर्शवते.

क्लिअरटॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता यांनी सांगितले, ‘व्यवसाय लहान असो किंवा मोठा, ऑटोमेटेड ईवे बिल प्रणाली असल्यामुळे अनुपालन जलद आणि सुरळीतपणे होते. प्रगत तंत्रज्ञानाशिवाय ईवे बिल अनुपालन सांभाळणे, ही कोणत्याही कंपनीसाठी डोकेदुखी होऊ शकते. क्लियरटॅक्स ईवे बिलमधील लाभांसहित ऑटोमेशन आणि गतीमुळे अनुपालन अगदी सहज होईल आणि तो व्यवसाय मौल्यवान मनुष्यबळाचे तास वाचवू शकेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link