Next
स्पेन येथे ‘डीकेटीई’चा आंतरराष्ट्रीय माजी विद्यार्थी मेळावा
प्रेस रिलीज
Thursday, July 11, 2019 | 02:57 PM
15 0 0
Share this article:

स्पेन येथे आयोजित ‘डीकेटीई’च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याप्रसंगी अ‍ॅसीमेट इटलीचे ट्रेनिंग हेड जॉर्जिओ कॅलक्युली, माटीओ स्कॉच, डॉ पी. व्ही. कडोले, सुनील पाटील, डॉ यू. जे. पाटील व ‘डीकेटीई’चे माजी विद्यार्थी

इचलकरंजी : बार्सिलोना (स्पेन) येथे ‘डीकेटीई’च्या माजी विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय मेळावा उत्साहात झाला. इंटरनॅशनल टेक्स्टाइल मशिनरी असोसिएशन (इटमा) २०१९ या प्रदर्शनात ‘डीकेटीई’च्या स्टॉलचा समावेश होता. ‘डीकेटीई’त शिक्षण घेऊन देशविदेशात नामांकित कंपन्यात कार्यरत असणारे विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी होतात. या प्रदर्शानात बहुतांशी स्टॉलवर ‘डीकेटीई’चे माजी विद्यार्थी प्रतिनिधीत्व करीत होते. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘डीकेटीई’ विद्यार्थ्यांचे नेटवर्क वाढविणे या हेतूने प्रत्येक प्रदर्शनामध्ये ‘डीकेटीई’मार्फत माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांना नवीन ओळखी, नोकरीच्या संधी, व्यवसायासाठी उपयुक्त माहिती व त्यामधील संधी या गोष्टीच्या देवाणघेवाणीचा लाभ होतो. 

मेळाव्याच्या सुरुवातीला संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी ‘डीकेटीई’च्या प्रगतीच्या दिशेने चढत्या आलेखाची माहिती देऊन या विशेष समारंभाची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. ‘डीकेटीई’चे विद्यार्थी आपआपल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत असून, ते इन्स्टिट्यूटचे आधारस्तंभ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कर्तृत्व व यशामुळे आज ‘डीकेटीई’चा नावलौकिक असल्याचे नमूद केले.  

कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून अ‍ॅसीमेट इटलीचे ट्रेनिंग हेड, मेंबर रिलेशन्स जॉर्जिओ कॅलक्युली व शॉक रीडस कंपनी, इटलीचे सीईओ माटीओ स्कॉच उपस्थित होते. या प्रसंगी कॅलक्युली यांनी ‘डीकेटीई’शी झालेल्या करारांतर्गत येथील विद्यार्थ्यांना विविध टेक्स्टाइल प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल व उत्तम प्रकल्पास सन्मानित करणार असल्याची माहिती दिली. स्कॉच यांनी ‘डीकेटीई’चे विद्यार्थी जगभर विविध कंपन्यामध्ये उच्चपदावर उत्कृष्टपणे काम करीत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. 

माजी विद्यार्थी संतोष काळे याने ‘डीकेटीई’चे प्रथम प्राचार्य दी. बा. आजगांवकर यांच्या आठवणींना उजाळा देऊन माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आजगांवकर सरांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर माजी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. अमेरिकेमधून एमएस पदवी प्राप्त व बायोमेडिकल कंपनीत वैज्ञानिक म्हणून कार्यरत असणारे संदीप पवार यांनी ‘डीकेटीई’चा माजी विद्यार्थी असल्याचा आनंद आणि अभिमान व्यक्त केला. अमेरिकेतून पीएचडी पदवीप्राप्त व अ‍ॅपल कंपनीत कार्यरत असणारे सजीश कुमार यांनी ‘डीकेटीई’ने दिलेल्या संस्कारामुळे व आदर्श विचारांमुळे आम्ही जीवनात यश मिळविल्याची भावना मनोगतात व्यक्त केली. उस्टर टेक्नॉलॉजीजमध्ये (स्वित्झर्लंड) जनरल मॅनेंजर पदावर कार्यरत अमोल केंकरे यांनी भविष्यकाळातही ‘डीकेटीई’ व उस्टर बरोबरचे संबंध वृद्धिंगत होतील, असे सांगितले. या वेळी ८० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.  
 
या प्रसंगी ‘डीकेटीई’चे ट्रस्टी सुनील पाटील, ‘डीकेटीई’ सीओईचे राहुल दुधाणे, प्रा. एल. जी. पाटील, प्रा. डॉ. वाय. एम. इंडी, इटालियन ट्रेड एजन्सीचे प्रतिनिधी, इनमॅनो स्पेरदुती, कुकर अ‍ॅंड असोसिएट्सचे चिप कुकर, आजरासह सूतगिरणीचे चेअरमन अशोक चराटी, व्हाइस चेअरमन डॉ. देशपांडे उपस्थित होते. हॉफ विद्यापीठात (जर्मनी) शिक्षण घेत असलेले ‘डीकेटीई’चे विद्यार्थी यश जगवानी, विष्णू टेलर, पुलकित सारडा, प्रणव मर्दा, लिब्रेस विद्यापीठातील (झेक रिपब्लिक) सुमित अग्रवाल, इटलीहून नोबेल कांबळे, नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीतील (अमेरिका) प्रनील वोरा, रेमंड्स, वर्धमान, ट्रायडंट यांसारख्या अनेक इंडस्ट्रीजचे पदाधिकारी, उद्योजक आवर्जून उपस्थित होते.                                                 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search