Next
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे
हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांचे आवाहन
नागेश शिंदे
Wednesday, November 28, 2018 | 02:55 PM
15 0 0
Share this story

हिमायतनगर : येथील नृसिंह किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलमध्ये गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी १५०हून अधिक विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

२७ नोव्हेंबर २०१८ रोजी सुरू झालेल्या रोजी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेतून आठ हजार ५०० बालकांना लसीकरण केले जाणार आहे. गोवर-रुबेलामुळे येणारे अपंगत्व आणि अन्य दुष्परिणाम टाळण्यासाठी त्याचा समूळ नायनाट होण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. सर्वांनी सहकार्य करून ही लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी केले. लसीकरणाचा शुभारंभ राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. 

या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक एस. एम. गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. शेळके, सहायक गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर, पोलीस उपनिरीक्षक काळे, वैद्यकीय अधिकारी डी. डी. गायकवाड, डॉ. अलकाराणी मुनेश्वर, डॉ. अविनाश गुंडाळे, डॉ. सुचित मामीडवार, डॉ. ज्ञानेश्वर कदम, डॉ. भुरके, डॉ. वाळके, रमेश धांडे, नृसिंह इंग्लिश स्कूलचे संचालक संजय मारावार आदींसह शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, आरोग्य कर्मचारी, नर्स, सिस्टर आदींसह पालकांची उपस्थिती होती. त्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.           

प्रभातफेरी काढून दिला लसीकरणाचा संदेश
तत्पूर्वी हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिरापासून शहरातील मुख्य रस्त्याने आरोग्य विभागाच्या पुढाकारातून लसीकरणाचा संदेश देणारी प्रभातफेरी काढण्यात आली. त्याचा शुभारंभ तहसीलदार आशिष बिराजदार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link