Next
अभंग : स्वरूप आणि चिकित्सा
BOI
Thursday, July 05, 2018 | 10:39 AM
15 0 0
Share this story

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अभंग हाही एक भाग आहे. अभंग हा जसा आध्यात्मिक जीवनाचा एक भाग आहे, तसाच सामाजिक जीवनाचाही. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या अभंगवाणीने अवघा महाराष्ट्र घडवला. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी या पुस्तकात अभंगाचे स्वरूप सांगून चिकित्सा केली आहे. संतांची मानवतावादी दृष्टी, त्यांचे सामाजिक विचार या अभंगामधून स्पष्ट होतात.

संतांच्या अभंगांचे वाङ्मयीन विशेष सांगून अभंगांच्या प्रकारांवरही त्यांनी चर्चा केली आहे. त्यांच्या अभंगांची वैशिष्ट्येही त्यांनी उलघडली आहेत. ‘अभंगांचे स्वतंत्र छंदशास्त्र आहे,’ असे प्रा. लबडे सांगतात. त्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ओवी आणि अभंग यातील फरकही स्पष्ट केला आहे.

प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स
पाने : १९९  
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link